Categories: नाशिक

मराठा आंदोलनासाठी नाशिकमधून अन्नछत्र सेवा

तब्बल 20 पिकअप अन्नसामग्री शहरातून रवाना

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यामधून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठा समाजबांधव मुंबईत मराठा आरक्षणासाठी न्यायिक लढा देत आहेत. या समाजबांधवांची जेवणाची व्यवस्था कुठेही कमी पडू नये म्हणून रविवारी (दि. 31)नाशिक जिल्ह्यातील विविध तालुके व शहरातून तब्बल 20 पिकअप अन्नसामग्री पाठविण्यात आली आहे.
चपाती, भाकरी, ठेचा, लोणचं, पाण्याच्या बाटल्या, राजगिर्‍याचे लाडू, बिस्किटे, चिवडा, भत्त्याची पाकिटे यांसारखी आवश्यक सामग्रीचा समावेश असून, साधारण 50 हजार लोकांचे जेवण होईल इतकी व्यवस्था रविवारी नाशिक जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
यानंतरही रोज मोठ्या प्रमाणात अन्नछत्र व आर्थिक रसद नाशिक जिल्ह्याच्या वतीने पुरवली जाणार आहे. रविवारी नाशिकचे ग्रामदैवत कालिकामाता मंदिर, मुंबई नाका याठिकाणी दिंडोरी, नाशिक ग्रामीण तालुक्यातील गिरणारे, मखमलाबाद, दुगाव, दरी तसेच नाशिकरोड, सिन्नर, येवला या भागांतून विविध गाव-खेड्यांतून या गाड्या आल्या होत्या. या सर्व गाड्यांना एकत्रित करत शहरातील जमा झालेले कालिका मंदिर येथील साहित्य या गाड्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. या अन्नदानासाठी सक्रियपणे मदत करणार्‍या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील समाजबांधवांचे नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी या नियोजनात नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजबांधव करण गायकर, नानासाहेब बच्छाव, केशव (अण्णा) पाटील, विलास पांगारकर, नितीन सुगंधी, भारत पिंगळे, राम खुर्दळ, नितीन थेटे, योगेश नाटकर पाटील आदींसह समाजबांधव नियोजनासाठी कालिका माता मंदिर याठिकाणी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील समाज बांधवांना मदत करताना काही अडचण आली किंवा मदत पोहोचवायची असेल तर पुढील नंबरवर संपर्क साधावा.
करण गायकर 9673754141 नितीन सुगंधी पाटील 8767886494 विलास पांगारकर 9326191911 नानासाहेब बच्छाव 9822133355 राजू देसले 7066669894 राजेंद्र शेळके 9822199041 आशिष हिरे 8208512684

ज्या समाजबांधवांना मुंबई येथील आंदोलनासाठी बिस्किटेे, राजगिर्‍याचे लाडू, बिसलरी बॉक्स, चिवडा, भत्ता, कोरडा शिधा पाठवायचा असेल त्यांनी मुंबई नाका येथील नाशिकचे ग्रामदैवत कालिकामाता मंदिर येथे जमा करावा. आपली मदत आपल्या समाज बांधवांच्या आंदोलनाला निश्चित ताकद देईल. कारण ही लढाई मराठा योद्धा जरांगे पाटलांनी अंतिम केलेली असून, यासाठी आपण सर्वजण आपल्या परीने होईल ती मदत करून आंदोलनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे.
– करण गायकर, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago