नाशिक

निमा पॉवर एक्झिबिशन -2023 ची घोषणा

 

माहिती पुस्तिकेचे आज अनावरण-बेळे

 

नाशिक:प्रतिनिधी

नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक ज्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करीत आहेत त्या *निमा पॉवर* एक्झिबिशनचे 19 ते 22 मे 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले असून त्याच्या बोधचिन्ह तसेच माहिती पुस्तिकेचे अनावरण निमा हाऊस येथे सोमवारी (दि.3 एप्रिल) संपन्न होत आहे,अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे,महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि विद्युत निरीक्षक भागवत उगले उपस्थित राहणार आहेत.

निमातर्फे दहा वर्षा पूर्वी 2013 साली प्रथम आवृत्ती मध्ये निमा पावर हे प्रदर्शन घेण्यात आले होते, 2016 ला झालेल्या निमा पावर प्रदर्शनानंतर,मधल्या जवळपास चार ते पाच वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,इन्स्ट्रुमेंटेशन,ऑटोमेशन, मेकॅटॉनिक्स, अशा विशेष विषयांकित असलेले अशा प्रकारचे प्रदर्शन व B 2 B होत असल्याने या संबंधित तसेच इतरही सर्व उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांची व सर्वसामान्य नाशिककर नागरिकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे असे म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 2013 मध्ये प्रथमच आयोजित केलेल्या निमा पॉवर मुळेच उत्तर महाराष्ट्राला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले. इलेक्ट्रिकल संबंधित उद्योगां साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली सीपीआरआयची टेस्टिंग लॅब नाशिकला या प्रदर्शनामुळेच मिळाली आणि नाशिककरांसाठी ही मोठी देणगीच म्हणावी लागेल.ऑटोमोबाईल हब बरोबरच, नाशिक हे इलेक्ट्रिकल हब म्हणूनही मोठ्याप्रमाणात महत्त्वपूर्ण असे हब आहे, इलेक्ट्रिक व त्या संबंधित विषयक 1000 हून अधिक कंपन्या नाशिकची शोभा वाढवित आहेत.त्यामुळेच निमा पॉवर -2023 एकप्रकारे औद्योगिक कुंभमेळाच ठरणार आहे.प्रदर्शनात विविध परदेशी गुंतवणूकदार, वेगवेगळ्या देशांचे कांस्युलेट जनरल व कमर्शियल ऑफिसर्स, विविध मल्टिनॅशनल कंपन्यांचे व इतरही नामवंत कंपन्यांचे सिओ, कमर्शियल उपाध्यक्ष, स्वतः मालक व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रतिनिधीउपस्थित राहणार असून B2B मध्येही सहभागी होणार आहेत, या प्रदर्शनामुळे नाशिकच्या औद्योगिक तसेच नागरी अर्थचक्रासही गती मिळणार असल्याने सर्वानाच त्याची प्रतीक्षा असल्याचेही बेळे यांनी नमूद केले.

निमा पॉवर 23 च्या यशस्वीतेसाठी निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे,उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,खजिनदार विरल ठक्कर, सहसचिव हर्षद ब्राह्मणकर , निमा पावर कमिटी चेअरमन श्री मिलिंद राजपूत, कार्यकारणी सदस्य गोविंद झा,जयंत जोगळेकर,रवींद्र झोपे,राजेंद्र वडनेरे,वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे ,नितीन वागस्कर,जितेंद्र आहेर,मनीष रावळ, श्रीकांत पाटील, एस.के.नायर,सुधीर बडगुजर,सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी, दिलीप वाघ, हेमंत खोंड,रवी श्यामदासानी, विराज गडकरी, कैलास पाटील, शशांक मनेरिकर, संजय राठी, रावसाहेब रकिबे, विजय जोशी, व्यंकटेश मूर्ती, वैभव चावक, विश्वास शिंपी, पंडित ब्राह्मणकर, बाळासाहेब जाधव, आदी परिश्रम घेत आहेत.

माहिती पुस्तकाचे अनावरण कार्यक्रमास उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमा पावर कमिटी व निमा पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago