हातमाग व वस्त्रोद्योग पदविकेसाठी १० जून पर्यंत करावेत अर्ज

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी १० जून पर्यंत करावेत अर्ज :शीतल तेली
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 10 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली यांनी  कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे 13 + 1 तसेच वेंकटगिरी येथे 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत १० जून २०२२ पर्यंत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.
उमेदवारांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध करूनदेण्यात आला असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली यांनीदिली आहे.
Devyani Sonar

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

9 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

16 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

16 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

16 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

17 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

17 hours ago