सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी 30 जून पर्यंत करता येणार अर्ज :ले. कमांडर ओंकार कपाले नाशिक : प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता जिल्हा सैनिकी मुला मुलींचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या विरपत्नी व सेवारत सैनिक यांनी वसतिगृह प्रवेशासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश अर्ज 30 जून 2022 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सैनिकी मुला मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक पालकांनी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी संबंधित वसतिगृहातुन प्रवेश अर्ज व माहिती पत्र घेवून आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृह अधिक्षक व अधिक्षिका यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतांना डिस्चार्ज बुक, माजी सैनिक/ सैनिक विरपत्नी असल्याबाबतचे ओळखपत्र, ECHS कार्ड इत्यादी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहेत. प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर वसतिगृह व्यवस्थापन समितीमार्फत अर्जांची छाननी करून निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी सोमवार 4 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, शासकीय दुध डेअरी जवळ, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड,नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे. हे ही वाचा :
| |
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…