महाराष्ट्र

हृषिकेश आणि प्रियदर्शन निघाले छुपे रुस्तम

लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या मात्र नाट्यवर्तुळात हे दोघेही छुपे रुस्तम असल्याची चर्चा रंगली आहे? या दोघांना छुपे रुस्तम का म्हटलं जातय? नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे? या सगळ्याचा खुलासा येत्या १५ मे ला होणार आहे. हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत.
प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे दोन अंकी  नाटक १५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ही जोडगोळी एकत्र येणार म्हणजे काहीतरी खुमासदार असणार हे वेगळं सांगायला नको. फार्स, गंमत, गॅासिप, लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जात. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे सांगतात.
शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील  लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल  म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक. ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव या दोघांसोबत मयूरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं.
रविवार १५ मे दुपारी ४.१५ वा. दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले आणि सोमवार १६ मे दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिर दादर येथे या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.
प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी ‘छुपे रुस्तम’ नाटकाची निर्मीती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धे मध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकासोबत ज्वलंत, आशयघन व  विनोदाची हळूवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ यासारख्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक तेजस रानडे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago