आ.कांदे यांच्या पुढाकाराने बाराशेवर उमेदवारांच्या मुलाखती
नांदगाव : प्रतिनिधी
नांदगाव मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार सुहासअण्णा कांदे व अंजुमताई सुहास कांदे यांच्या पुढाकाराने नांदगाव शहरात भव्य महा रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्यात पात्र विद्यार्थ्यांना ऑफर लेटरचे वाटप करण्यात आले.
हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (नाशिक), युवाशक्ती फाउंडेशन (नाशिक) आणि गुरुकुल पॉलिटेक्निक (नांदगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
रोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा (नाशिक), बॉश लिमिटेड (नाशिक), युवाशक्ती स्किल इंडिया, बजाज सन्स, आनंद आय पॉवर, टपरिया टूल्स, धुमाळ इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, सोलर डाटा मॅट्रिक्स, ग्लोबल सर्व्हिसेस, श्रीराम फायनान्स लिमिटेड यांसारख्या जवळपास 150 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मेळाव्याचे उद्घाटन युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान आणि नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात मतदारसंघातील विविध भागांतून आलेल्या 1,200 हून अधिक युवक-युवतींनी मुलाखती दिल्या. मुलाखतीनंतर निवड झालेल्या पात्र उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ नियुक्तीपत्रे (ऑफर लेटर) सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस रवी देवरे यांनी उपस्थित तरुण-तरुणींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त रिसे, एमआयडीसी संचालक शिंदे, युवाशक्तीचे गिरीश लाड, विजय देसाई, सागर पवार, चिंचोरे साहेब, निलेश गांगुर्डे, चेतन कासार, नितीन आहेर, कामगार विकास सेनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस रवी देवरे, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, तसेच ओबीसी महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाचे सदस्य आणि गुरुकुलचे झारखंडे उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Appointment letters distributed at a grand job fair in Nandgaon city.