नाशिक शहर

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी योगिता आहेर यांची नियुक्ती

युवती शहराध्यक्षपदी ऐश्वर्या गायकवाड

नाशिक : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सक्रीय होऊन कामाला लागावे अशा सूचना माजीमंत्री छगन भुजबळ यांनी महिला पदाधिकार्‍यांना केल्या.
राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस पार्टीच्या नाशिक शहर महिला अध्यक्षपदी योगिता आहेर तर युवती शहराध्यक्षपदी ऐश्वर्या गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन अध्यक्षांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी छगन भुजबळ यांनी महिला पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचे काम खा.शरदचंद्र पवार साहेबांनी केले आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात महिलांना सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे. नवनियुक्त महिला पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व खा.शरदचंद्र पवार यांचे विचार, धेय्य धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्य द्यावे. निवडणुकीत महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याने इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवून काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या कधीही लागू शकता त्यामुळे आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. त्यादृष्टीने नवनियुक्त महिला पदाधिकार्‍यांनी जुन्या नवीन पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन कार्यकारिणी लवकरात लवकर तयार करावी. यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथांच्या महिलांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी तयार करण्यात येऊन कामाला लागावे अशा सूचना त्यांनी उपस्थित महिला पदाधिकार्‍यांना केल्या.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago