एक मिनिटाच्या आत 25 कोटींच्या कामांना मंजुरी

‘स्थायी’चा प्रताप; विषयांवर चर्चा न करताच मान्यता

नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषदेची आचारसंहिता संपुष्टात येताच नाशिक महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. 30 जून) झाली. मात्र, मागील सभेप्रमाणे मंगळवारच्या सभेतही एक मिनिटाच्या आत तब्बल 25 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, जे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते, त्यावर चकार शब्द न काढता त्यांना मंजुरी दिल्याचा प्रकार घडला. दरम्यान, यामुळे स्थायी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही कोणती सभा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा झाली. दरम्यान, एक
मिनिटाच्या आत कोट्यवधींच्या कामांना मंजुरी दिल्याने स्थायी सदस्यांमध्ये यावरून असंतोष दिसला. सभापती सानप यांनी कोट्यवधींच्या जादा विषयांना दाखलमान्य करून मंजूर असल्याचे सांगत लगेचच राष्ट्रगीत घेतले. सदस्यांना अत्यंत कमी वेळ देत एकामागून एक विषय मंजूर केल्याने सदस्यांना म्हणणे मांडण्यासाठी वेळच मिळाला नाही.
या बैठकीत शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 24 कोटी 66 लाखांंच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यात रस्तेविकास, पाणीपुरवठा व्यवस्था, स्मशानभूमींची देखभाल, तसेच मनपा इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. सर्वाधिक निधी रस्ते खडीकरण, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी मंजूर करण्यात आला. याअंतर्गत नवीन नाशिक प्रभाग क्रमांक 31 मधील महाराष्ट्र नॅचरल गॅस पाइपलाइन टाकल्यानंतर खोदलेल्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 5.21 कोटी, अंबड एमआयडीसी परिसरातील पॉवर हाउस ते तेलुसी कंपनीदरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 5.08 कोटी, तसेच समर्थनगर आणि ज्ञानेश्वरनगर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 2.87 कोटी मंजूर करण्यात आले. या कामांवर एकूण सुमारे 13.18 कोटींचा खर्च होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विभागांतील जलवाहिन्यांची गळती बंद करणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, दूषित पाणी शोधणे आणि देखभाल यासंबंधी अकरा कामांना मंजुरी देण्यात आली. इतर भागातील कामांना मंजुरी दिली गेली. स्थायी सभेत किरण गामणे, योगेश गाडेकर, दीपाली कुलकर्णी, भारती ताजनपुरे, आदिती पांडे आदींनी चर्चेत भाग घेतला.

दिवे यांचे स्थायी कारभारावर बोट

पटलावरील विषयांवर सखोल चर्चा होणे अपेक्षित असताना, ते घाईघाईने मंजूर करण्यात येत असल्याची टीका शिंदेसेनेचे नगरसेवक राहुल दिवे यांनी केली. प्रशासनावर स्थायी समितीचा वचक नसल्याचाही आरोप केला. दरम्यान, किरण गामणे यांनी टीडीआरसंदर्भातील प्रलंबित प्रश्न, तसेच अतिरिक्त दराने डांबर खरेदीच्या विषयावर जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या विषयाला महत्त्व न देता व त्यावर कुठलीही चर्चा न करता सभापतींनी कामकाज सुरू ठेवल्याने गामणे यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

Approval for projects worth ₹25 crore within a minute.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago