नाशिक

सिन्नर बसस्थानक बनले खासगी वाहनांचे पार्किंग झोन

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

सिन्नर : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरातील अवैध वाहतूक आणि बेशिस्त पार्किंग रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविल्याचा दावा केला असला, तरी सिन्नर बसस्थानकात मात्र याच्या पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळत आहे. बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात खासगी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. परिणामी, बसस्थानक हे प्रवाशांसाठीचे केंद्र न राहता खासगी वाहनांच्या पार्किंगचे आगार बनल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार राज्यभर अवैध प्रवासी वाहतूक आणि बेशिस्त पार्किंगविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत बसस्थानक परिसरातील 200 मीटरच्या हद्दीत खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) मदतीने कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, सिन्नर बसस्थानक परिसरात या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते अंतर्गत परिसर आणि संरक्षक भिंतीलगत मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत आहेत. अनेक वाहनधारक ‘नो पार्किंग’ फलकांकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहने उभी करत असल्याचे दिसते. त्यामुळे बसस्थानकात येणार्‍या आणि बाहेर जाणार्‍या एसटी बसेसना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत बसचालकांना वाहन वळविताना अडथळ्यांचा सामना करावा लागत असून, अपघाताची शक्यता वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकात येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थी यांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे.
एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 15 जूनदरम्यान अनधिकृत पार्किंग विरोधात मोहीम राबविण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र, मोहिमेचा कालावधी संपल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाल्याचे दिसत आहे. कारवाईचा धाक नसल्याने नियमभंग करणार्‍यांचे धाडस वाढल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे. बसस्थानक परिसरातील वाढती बेशिस्त पार्किंग, अनधिकृत वाहतूक आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढत आहे. त्यामुळे ‘नो-एन्ट्री’ नियमाची कठोर अंमलबजावणी करून नियमित दंडात्मक कारवाई करावी, तसेच बसस्थानक परिसर वाहनमुक्त ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी वर्गातून होत आहे.

Sinnar bus station has become a parking zone for private vehicles.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago