नाशिक

कुंभमेळा नियोजनात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे स्वयंसेवक

श्री श्री रविशंकर यांच्याशी मंत्री महाजन यांची चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य शासनाने तयारीला वेग दिला असून, आता सामाजिक व आध्यात्मिक संस्थांचाही सहभाग वाढताना दिसत आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि. 21) बेंगळुरू येथील द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन आश्रमात परमपूज्य श्री श्री रविशंकर यांची भेट घेऊन आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनावर सखोल चर्चा केली.
या भेटीत मंत्री महाजन यांनी गुरुदेवांना आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी हे निमंत्रण स्वीकारत कुंभमेळ्यासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांचे सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.
मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती सादर केली.
देश-विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी येत असल्याने प्रशासनासमोर गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता व भाविकांना मार्गदर्शन यांसारखी मोठी आव्हाने उभी राहतात. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या व्यापक स्वयंसेवक नेटवर्कचे सहकार्य मिळावे, अशी विनंती केली. त्यास प्रतिसाद देत गुरुदेवांनी मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
दरम्यान, मंत्री महाजन यांनी आश्रमातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी स्वामी वैशंपायन, विशाल चव्हाण आणि नीलेश बोरा उपस्थित होते.

Art of Living volunteers help plan Kumbh Mela

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago