नाशिक

नाशिक शहरात सप्टेंबर महिन्यात तब्बल सात खून

♦ खुनाची काही कारणे
♦ जुन्या भांडणाची कुरापत
♦ पैशाचा वाद
♦ वर्चस्ववाद
♦ प्रेमप्रकरण
♦ अनैतिक संबंध
♦ जमिनीचा वाद
♦ टोळीयुद्ध
♦ सोशल मीडिया

नाशिक शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमालीचा उंचावला आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत शहरात खुनाच्या तब्बल 42 घटना घडल्या. विशेष म्हणजे, या खुनाच्या आरोपींत अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने या अल्पवयीन गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. अल्पवयीन गुन्हेगारांचे आका शोधून काढण्याची गरज आहे.

सप्टेंबरमध्ये नाशिक शहरात खुनाच्या तब्बल सात घटना घडल्या. विशेष म्हणजे, एकाच दिवशी दोन खुनाचे प्रकार घडले. या सातपैकी श्रमिकनगरच्या युवकाचा तर किरकोळ कारणावरून हकनाक बळी गेला. इतर खुनाचे प्रकार पूर्ववैमनस्य, हाणामारीतून गंभीर दुखापत होऊन मृत्यू यातून घडले आहेत. अगदी किरकोळ कारणातून थेट खुनापर्यंत मजल जात असल्याने शहरातील गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे निर्माण झाले आहेत.
सप्टेंबर महिन्यात नाशिक शहरात तब्बल सात खून झाले. 58 जणांवर जीवघेणा हल्ला झाला. त्यात गोळीबारासारख्या घटनांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या घटनांमध्ये दोन राजकीय मंडळींना तुरुंगाची वारी करावी लागली. पंचवटीतील भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील गोळीबार प्रकरणात, तर पंचवटीतीलच उद्धव निमसे खून प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 46 गुन्ह्यांची नोंद गेल्या महिन्यात झाली. त्याखालोखाल पंचवटीचा क्रमांक लागतो.
नाशिक शहर ही कुंभनगरी म्हणून ओळखली जाते; परंतु गेल्या काही दिवसांत शहराची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे होत आहे.

अल्पवयीन बनला भाई,
हवी कडक कारवाई!

शहरात गेल्या काही महिन्यांपासून शाळा-कॉलेजच्या वयात असलेली मुलं, ज्यांच्या हातात पेन-पुस्तकं असायला हवीत, त्यांच्याच हातात आता कोयते, धारदार शस्त्रं दिसत आहेत. करिअर करण्याच्या वयाच्या टप्प्यावर ही मुलं चुकीच्या संगतीत अडकली आहेत. व्यसनाच्या नादात आणि पैशाच्या हव्यासात गुन्हेगारीकडे वळलेली ही अल्पवयीन पिढी आता ’भाई’ बनत आहे. अल्पवयीन असल्यामुळे पंधरा ते वीस दिवसांत ते बालसुधारगृहातून सुटून येत आहेत. शिक्षेचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळेच बहुतांश खुनाच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग अलीकडच्या काळात चिंतेचा विषय बनू पाहत आहे.
अल्पवयीन मुलांच्या कारनाम्यांमुळे नाशिक शहराची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरू झाली आहे की काय, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना सतावू लागला आहे. सिगारेटपासून सुरू होणारा अल्पवयीन मुलांचा प्रवास एमडी ड्रग्जपर्यंत येऊन थांबतो. या व्यसनासाठी पैसे लागतात. पैशाची सोय करण्यासाठी मुलं चोरी करतात, लोकांना धमकावतात आणि गाड्या फोडून त्यातून चोरी करण्याचा मार्ग अवलंबतात. काही भागात तर रात्री उशिरा उभ्या केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून आतलं साहित्य चोरलं जातं. यामुळे सामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान होतं, पण त्याहून मोठं नुकसान म्हणजे लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती. गाड्या फोडणं किंवा दगडफेक करणं इतक्यावरच ही मुलं थांबत नाहीत. हातात कोयते, चाकू आणि धारदार हत्यारे असतात. रस्त्यावर टोळक्याने फिरून ते जोरजोरात ओरडतात, नागरिकांना धाक दाखवतात आणि दहशत माजवतात. एखाद्यानं त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तर ते उघडपणे म्हणतात, पोलिसांना बोलवा, आमचं काहीही होणार नाही. या एका वाक्यानं लोकांच्या मनात पोलिसांविषयीच प्रश्न निर्माण होतो की, नेमकी कारवाई होते की नाही?
अनेक वेळा या मुलांवर गुन्हे दाखल होतात, पण अल्पवयीन असल्यामुळे कायद्यानं त्यांना कठोर शिक्षा होत नाही. केस र्र्गीींशपळश्रश र्गीीींळलश इेरीव कडे जाते. काही दिवस ेलीर्शीींरींळेप हेाश मध्ये ठेवून ते पुन्हा बाहेर येतात. परिणामी पुन्हा तेच चेहरे रस्त्यावर दिसतात आणि पुन्हा तोच प्रकार घडतो. काही वेळा तर ’भाई’ तुरुंगात गेला तरी तीन महिन्यांत बाहेर येतो. त्यानंतर पुन्हा त्याच दादागिरीनं लोकांना त्रास देतो. त्यामुळे लोकांच्या मनात असा समज निर्माण झालाय की, अल्पवयीन असूनही गुन्हा करणं काही मोठं नाही. शिक्षा होणारच नाही, त्यामुळे धाक नाही.
या सर्व प्रकारांचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतो आहे. रात्री गाड्या बाहेर पार्क करणं धोकादायक ठरत आहे. दुकानं बंद करून माल ठेवणं धोकादायक वाटतं. पालक आपल्या मुलांना रात्री शिकवणीला किंवा क्लासेसला एकटं पाठवायला घाबरतात. परिसरात नेहमी दहशतीचं वातावरण असतं. या मुलांच्या गोंगाटामुळे, आरडाओरडीमुळे, धमक्यांमुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. व्यापार्‍यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. गाड्यांच्या काचा पुनः पुन्हा फोडल्यामुळे विमा कंपन्याही हात झटकतात.

 

कोयता गँगचा धुडगूस
खेळणीच्या दुकानात खेळणी सहजरीत्या मिळते अगदी त्याप्रमाणे गुन्हेगारांकडे कोयते मिळत आहेत. श्रमिकनगर येथील टवाळखोर रस्त्याने जात असताना ज्या युवकावर हल्ला केला त्यात कोयता गँग होती. याचाच अर्थ हे टवाळखोर रस्त्याने फिरताना थेट कोयते घेऊनच फिरतात. सहजरीत्या हे कोयते कुठून उपलब्ध होतात, याकडे पोलिसांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे. कोयता गँगने शहरात मोठा धुडगूस चालविला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या फोडण्यात ही कोयता गँग आघाडीवर आहे. त्यांच्याकडे कोयते नेमके येतात तरी कुठून, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. हातात कोयते घेऊन धिंगाणा घातला जात असताना सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत.

वाहनांची तोडफोड नित्याचीच

नाशिक शहरात वाहनांची तोडफोड नित्याचीच झाली आहे. हातात कोयते घ्यायचे आणि वाहने फोडायचे. असले उद्योग अल्पवयीन मुलांकडून होत आहेत. नाशिकरोड, सिडको, इंदिरानगर, देवळाली कॅम्प, शिवाजीनगर, सातपूर या भागात गेल्या वर्षभरात वाहने तोडफोड करण्याचे प्रकार घडले. विशेष म्हणजे, यातील गुन्हेगार पकडले तरी पुनः पुन्हा या घटना घडतच असल्याने वाहने तोडफोड करणार्‍यांवर कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी कठोर उपाय पोलिसांनी शोधून काढण्याची गरज आहे.

गुन्हेगारांची धिंड काढून प्रसाद

शहरात गुन्ह्यांची संख्या वाढताच पोलिसही गेल्या काही दिवसांत चांगलेच अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांची धिंड काढण्याबरोबरच चौकाचौकांत त्यांना पोलिसी प्रसाद देण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे मोठे कौतुकही होत आहे. त्यांनी गुन्हेगारांविरोधात मोहीम हाती घेतल्याने गुन्हेगारी कमी होण्याची आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे. आरोपींविरोधात कठोर भूमिका पोलिस आयुक्त कर्णिक यांनी घेतल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणू लागले आहे.

अगदी एक रुपयासाठीही खून

खुनाचे प्रकार कशावरूनही घडू लागले आहेत. अगदी एक रुपयासाठीही खून झाल्याची घटना नाशिक शहरात घडलेली आहे. अंबडच्या दत्तनगर भागात एक रुपयाने सिगारेट महाग दिले म्हणून थेट पानटपरी चालकाचा खून करण्यात आला होता. केवळ गाडीचा कट लागला इतक्या क्षुल्लक कारणामुळे श्रमिकनगरला शहरात पोट भरण्यासाठी आलेल्या युवकाला मुकावे लागले.

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनियमितता

शहरात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सातत्याचा अभाव असल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी सातत्याने गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनसारख्या संकल्पना सातत्याने राबविण्याची गरज आहे. पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबविल्यास गुन्हेगारांवर काही प्रमाणात का होईना, पण नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

दारू दुकानाबाहेर ओपन बार;
खुलेआम मद्यसेवनामुळे नागरिक त्रस्त

अशोकनगर, कार्बन नाका आणि ध्रुवनगर परिसरातील दारू दुकानांच्या आजूबाजूला रोज संध्याकाळ होताच मद्यपींचा अड्डा निर्माण होत आहे. दुकानाबाहेर उभे राहून किंवा गल्ल्यांच्या कानाकोपर्‍यांत लपून हे लोक खुलेआम मद्यसेवन करतात. त्यामुळे परिसरातील शिस्त आणि शांततेचे वातावरण बिघडले असून, सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
दारूच्या नशेत हे लोक आरडाओरड, शिवीगाळ आणि भांडणं करतात. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या महिलांना व विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. काही वेळा किरकोळ कारणावरून गटागटांत हाणामार्‍यादेखील घडतात. परिसरात राहणार्‍या कुटुंबांना आणि जवळपासच्या व्यापार्‍यांना दररोज या गोंधळाचा सामना करावा लागतो आहे.
दुकानाबाहेर गोंधळ सुरू असतोच, पण भिंतीच्या आडोशाला किंवा रस्त्याच्या कडेला बसून मद्यसेवन करणार्‍यांमुळे आमच्या घरच्यांना बाहेर जाणं अवघड होतं. लहान मुलं शाळेतून परतताना घाबरून येतात, अशी नाराजी स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. कधीकधी पोलिस गस्त घालताना दिसतात, पण ती कारवाई तात्पुरतीच ठरते. काही वेळाने पुन्हा त्याच ठिकाणी गर्दुल्यांचा जमाव होतो आणि जुने प्रकार सुरू होतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक सामाजिक संस्थांनी आणि नागरिक संघटनांनी दारू दुकानांच्या आवारात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच दुकानांच्या परिसरात दारू सेवन करणार्‍यांवर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर या उच्छादाचा थेट परिणाम होत असून, त्यांच्या संयमाचा अंत आता जवळ आला आहे. जोपर्यंत या मद्यपींना आळा बसत नाही तोपर्यंत अशोकनगर, कार्बन नाका आणि ध्रुवनगर भागातील लोकांना त्रास सहन करावा लागणार, हे स्पष्ट झाले आहे.

याकडे पोलिसांनी द्यावे लक्ष

बसथांब्यावर अनेक टवाळखोर नेहमी उभे असतात.
दुचाकीवर ट्रिपल सीट बसून रस्त्याने जाताना जोरजोरात ओरडणे.
दुचाकीला सायरन बसवून गर्दीतून सुसाट वेगाने दुचाकी चालविणारे युवक.
रात्रीच्या वेळी दुचाकीहून जाताना आरडाओरड करणे.
चौकाचौकांत रात्रीच्या वेळी घोळका करून उभे राहणारे युवक.
रात्रीच्या वेळी चौकात वाढदिवस साजरा करून फटाके फोडणे, जोर जोरात ओरडणे, शिवीगाळ करणे.
चौकात दुचाकीवर केक कापणे.
याठिकाणी हवी नजर- आसारामबापू पूल, शिवाजीनगर, एमआयडीसी, ध्रुवनगर, सिंहस्थनगर सिडको, राजे संभाजी स्टेडियम, गोदाघाट, टाळकुटेश्वर पूल परिसर.

हे उपाय करा :
* हेल्प लाइन सुरू करा

* पोलिस गस्त वाढवा

* गुन्हा घडताना व्हिडिओ काढण्याऐवजी मदतीसाठी नागरिक प्रवृत्त होतील, यासाठी प्रबोधन करा

* शाळा, महाविद्यालयाजवळ साध्या गणवेशातील पोलिस नियुक्त करा

* गुन्हेगारांची धिंड काढतानाचे होर्डींग जागोजागी लावणे

 

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago