रील्सच्या नादात रिअल लाइफ धोक्यात
नाशिकरोडला कारागृहातून सुटलेल्या खुनातील आरोपीची मिरवणूक काढणार्या समर्थकांनी इन्स्टावर रील शेअर केला. त्यानंतर पोलिसांनी या तथाकथित ’भाई’च्या समर्थकांची चांगलीच वरात काढत त्यांना चौकाचौकांत नेत चोप दिला. देवळाली कॅम्प येथेही हातात कोयता घेत ’भाई’च्या पाया पड, असा रील बनविणार्यांच्या मुसक्या आवळत त्यांचीही धिंड काढण्यात आली.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरील इन्स्टा प्लॅटफार्मवर गुन्हेगारी संबंधित रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मिसरुडही न फुटलेले 15 ते 18 वयोगटातील मुले हातात कोयते, गावठी कट्टे घेऊन रील्स बनवितात. रील्स बनविताना कितीबी समोर येऊ द्या, एकटा बास…अशा प्रकारचे गाणे लावून ते व्हायरल करतात. जणू मोठा भाई झाल्याचा फिल रील्स बनविणार्यांना येतो; परंतु पोलिसी प्रसाद मिळाल्यावर रील्सच्या नादात रिअल लाइफ खराब झाल्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. शहरातील गुन्हेगारीने कळस गाठला असतानाच सोशल मीडियावर भाईगिरीचे रील्स टाकणार्यांचे उदंड पीक आले आहे. हातात तलवार घेऊन स्टेटसला ठेवणे, रील्स बनविणे हे प्रकार वाढीला लागले आहेत. त्यातूनच टवाळखोरांच्या गँग तयार होत आहेत. 15 ते 16 वयोगटातील मुलांना सामाजिक भान नसते. परिणामांची फिकीर नसते. त्यामुळे अपराध घडतात. श्रमिकनगर येथील खून प्रकरणात पकडण्यात आलेले अनेक जण अल्पवयीनच आहेत. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले हे अल्पवयीन युवक केवळ संगतीचा परिणाम म्हणून बिघडतात. परिणामांची जाणीव नसल्याने न कळत्या वयात गंभीर गुन्हे करून बसतात. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्याचा नाद आणि कुसंगतीचा परिणाम यामुळे या अल्पवयीन भाईंना सोशल मीडियाचा लागलेला नाद कमी करण्यासाठी पोलिसांनी आता मोहीम उघडण्याबरोबरच हातात कोयते घेऊन रील्स टाकणार्या रील्स स्टारला आवर घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…