गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच नाराजीनाट्य

नाशिक :  महायुतीचा गेल्या महिन्यापासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना  उमेदवारी जाहीर करण्यात आली .मात्र त्यानंतर महायुती मध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. तीन वर्षांपासून निवडणूक तयारी करत असलेले भाजपचे दिनकर पाटील हे गोडसे यांच्या उमेदवारीने नाराज झाले आहे. हेमंत गोडसे यांच्याबद्दल मतदार संघात मोठी नाराजी आहे. भाजपच्या नेत्यांनी आपल्याला तयारी करायला सांगितले होते.गोडसे हे गेल्या पाच वर्षात मतदारांना भेटले नव्हते, त्यामुळे आपण यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेऊन भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवारी करण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत, अनिकेत शास्त्री यांनी मात्र गोडसे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता मतदारसंघात हेमंत गोडसे ,महाविकास आघाडी चे राजाभाऊ वाजे, वंचित आघाडीचे करणं गायकर, अपक्ष शांतिगिरी महाराज हे उमेदवार उभे असून माघारीनंतरचित्र स्पष्ट होणार आहे,

दरम्यान,मंत्री  छगन भुजबळ यांनी गोडसे यांच्या उमेदवारी चे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *