चिमुकल्या बहीण-भावाचा डबक्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
डबक्याजवळ खेळत असताना डबक्यात पडून चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे घडली, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.तालुक्यातील रामनगर येथे गावाजवळच असणाऱ्या डबक्याजवळ आयुष रवींद्र बंडकर(५) व धनश्री रवींद्र बंडकर(४) हे बहीण भाऊ आणि एक लहान मुलगा खेळत होते. यावेळी खेळताना पाय घसरून डबक्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाला. सोबत खेळणारा मुलगा त्या ठिकाणी रडत बसला होता. गावात बस आल्यानंतर एक प्रवासी पायी जात असताना त्याला रडणारा मुलगा दिसला. या प्रवाशांने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर दोन जण डब्यात बुडाल्याची माहिती समोर आली. या प्रवाशाने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ तातडीने धावत आले त्यांनी दोघाना डबक्याबाहेर काढून दवाखान्यात नेले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मृत बहीण भावाचे वडील कामासाठी बाहेरगावी गेलेले होते तर आई घरी होती, या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *