सेलिब्रेशनमध्ये चाहते होऊ शकतात सहभागी, कसं ते जाणून घ्या …

अशोक सराफ येत्या 4 जूनला आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यानिमित्तानं चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होता येणार आहे. 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अष्टविनायक नाट्यसंस्था आणि परिवारातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अष्टविनायक संस्थेच्या व्हॅक्यूम क्लीनर नाटकात महत्त्वाची भूमिका करीत आहेत. या नाटकाचा शनिवारी 4 जून रोजी दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात सकाळी 10.30 वाजता प्रयोग होणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरादरम्यान अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकात अशोक सराफ यांच्यासोबत निर्मिती सावंत देखील महत्त्वाची भूमिका करीत आहेत. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. आणि याच नाट्यप्रयोगादरम्यान पार पडणार्‍या सन्मान आणि सत्कार सोहळ्यात नाट्यरसिकांना सहभागी होता येणार आहे. महाराष्ट्र, गोवा, इंदूर इत्यादी ठिकाणी या नाटकाचे आतापर्यंत 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत.

Devyani Sonar

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

22 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

24 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

2 days ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

2 days ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

2 days ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago