महाराष्ट्र

मोबाइल गेमच्या विळख्यात तरुणाई

मधुरा घोलप

मोबाइल गेम खेळण्यावरून आई रागावल्याने अल्पवयीन मुलाची आत्महत्या ही वार्ता वाचून मन सुन्न झालं. युवक म्हणजे सळसळतं रक्त! देशाचं भविष्य! पण हीच तरुणपिढी मोबाइल गेमच्या विळख्यात अडकलेली दिसतेय. पूर्वी विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जायचे. मोकळ्या हवेत मित्रांसोबत खेळ खेळताना शरीराला व्यायाम आणि मनाला ऊर्जा मिळायची. खिलाडूवृत्ती वाढीस लागायची. शिवाय, त्याच मित्रांबरोबर घरबसल्या बैठे खेळ खेळण्यातून आणि एकत्र अभ्यास करण्यातूनही मैत्रीचं नातं आणखीनच घट्ट व्हायचं. पण आता सगळ्यांच्याच हातात मोबाइल आल्यापासून प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहेत. आता मैदानेही कमी झाली आहेत आणि जी आहेत तीही आता ओस पडलेली दिसतात.

एकत्र येऊन सगळ्यांबरोबर खेळ खेळण्याविषयी अनास्था निर्माण होऊन हातातल्या मोबाइलच्या आडव्या स्क्रिनवर दिसणार्‍या इवल्याशा मैदानावरच आज क्रिकेट, खो-खो, कबड्डीचे सामने रंगताना दिसताहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे तर अगदी लहान मुलांनाही मोबाइल द्यावा लागतोय. पण सतत मोबाइल गेम खेळण्याने कमी वयातच जागरण, डोळ्यांचे आणि पाठीचे विकार जडणे, एकाग्रता कमी होणे, स्थूलपणा अशा समस्यांना तरुणाईला तोंड द्यावे लागते आहे. त्याचे अभ्यासावरही विपरीत परिणाम होताना दिसताहेत.

मोबाइल आणि त्यावरचे हे खेळ हेच एक व्यसन झालं आहे. झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून मोबाइल गेम्समध्ये आर्थिक गुंतवणूकही केली जाते. त्यात यश मिळालं तर पैशांचा लोभ वाढत जाऊन अशी व्यसनाधीनता वाढतच जाते. तर दुसरीकडे त्यातील अपयशामुळे नैराश्यग्रस्ततेचे प्रमाणही युवकांमध्ये वाढते आहे.

मूत्रपिंडाचा कर्करोग लक्षणे आणि उपचार

करमणुकीच्या नावाखाली या आभासी जगातल्या खेळांच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष वास्तवाचे भान विसरून कितीतरी तरुण आपल्या राहत्या ठिकाणापासून दुसर्‍याच कुठल्यातरी ठिकाणी नकळत जाऊन पोहोचल्याच्या वार्ता तर आपण रोजच ऐकतो आहोत. एवढंच नाही, तर काही मोबाइल गेम्समध्ये तर जीवावर बेतणारी कृत्ये करायला सांगितली जातात. ते करण्यातच खरं धाडस आहे. अशा चुकीचा विचार करून त्यापायी कित्येक तरुण आपला जीवही गमावून बसलेत.

‘अति तिथे माती’ या म्हणीनुसार कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे अशा तरुणपिढीची बुद्धी, शक्ती आणि सद्सद्विवेक मोबाइल गेममुळे व्यर्थ जाऊ न देता त्यांचा विधायक कामासाठी उपयोग करायला हवा.

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

18 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

37 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago