न्यायालयातील सहायक अधीक्षक
पाचशेची लाच स्वीकारताना अटकेत
नाशिक : प्रतिनिधी
दिवाणी न्यायालयातील सहायक अधीक्षक मनोज दत्तात्रय मंडाले (35) यांना पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्याचा दावा न्यायालयात दाखल करायचा होता सदरचा दावा दाखल करण्यासाठी लागणार्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो .सदरची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम भरल्यानंतर सदरचे प्रकरण लोकसेवक यांचेकडे जमा करावे लागते.
परंतु सदर ची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम प्रकरण जमा करण्यापूर्वी लोकसेवक यांच्याकडून काढून न घेतल्यास ते सदर प्रकरणात त्रुटी काढतात. त्यामुळे सदर प्रकरण जमा करण्यापूर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी लोकसेवक यांचेकडे घेऊन गेले असता कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात व सदर प्रकरणात सहकार्य करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 500 रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…