उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा
सिडको : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजी संकुल, भीमनगर, जेलरोड येथे रात्री तीनच्या सुमारास हत्याराने हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोशन भागवत काळे (वय 27, रा. भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी सतीश भालेराव, सूरज अनिल भालेराव आणि मयूर जानराव (सर्व रा. भीमनगर, जेलरोड) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवाजी संकुलाच्या पार्किंगमध्ये फिर्यादीवर कोयता व चॉपरने हल्ला केला. यात फिर्यादीच्या डोक्याला आणि उजव्या पायास दुखापत झाली.
या प्रकरणातील काही आरोपींपैकी काहींचा गंभीर गुन्ह्यांमध्ये पूर्वेइतिहास असून त्यांच्यावर गंभीर अशा गुन्ह्यांप्रमाणे कारवाई झाली आहे. काही आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील झाली होती. दरम्यान, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक स्नेहा बर्वे तपास करत आहेत.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…