नाशिक

पंचवटी परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघड

तीन आरोपी जेरबंद; गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 ची कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
पंचवटी परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपींना गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांची स्कोडा कार जप्त करण्यात आली. आरोपींपैकी एकावर नाशिक ग्रामीण परिसरातील निफाड, ओझर व सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
शहरातील मालमत्ताविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट 2 चे अधिकारी व कर्मचारी पोलिस नाईक मनोहर शिंदे, पोलिस शिपाई महेश खांडबहाले यांना क्रांंतीनगर, मखमलाबाद रोड येथे दिवसा घरफोडी करून काही जण विल्होळीजवळील डीमार्टजवळून पाथर्डी गावाच्या दिशेने कारने जात असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाथर्डी शिवारातील कचरा डेपोजवळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांत सागर दत्तात्रय गरड (वय 33), महेश सदाशिव मालखेडे (21) आणि एक विधिसंघर्षित बालक यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी क्रांतीनगर, मखमलाबाद येथील घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला लॅपटॉप व घड्याळ हस्तगत करण्यात आले आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, बाळू शेळके, शंकर काळे, गुलाब सोनार, संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी व तेजस मते यांनी केली.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago