नाशिक

स्वामी समर्थनगरात अल्टो कारवर हल्ला

ज्ञात टवाळखोरांकडून तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट लॉरेन्स स्कूल जवळील स्वामी समर्थनगर येथे उभी असलेल्या एका अल्टो कारची अज्ञात टवाळखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिडको परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून, गुरुवारी पहाटे एका महिला पोलीस कर्मचार्‍याच्या पतीच्या चारचाकी वाहनावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
संभाजी कडवे हे स्वामी समर्थनगरमधील गंगासागर रोहाऊसमध्ये राहतात. त्यांच्या घरासमोर त्यांची एमएच 15 बीडी 3071 या क्रमांकाची चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. गुरुवारी मध्यरात्री 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास चेतन तिडके आणि कमलेश तिडके यांनी त्यांच्या वाहनावर कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात गाडीच्या समोरील आणि पाठीमागील काचा पूर्णपणे फोडण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, संभाजी कडवे यांनी सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चेतन तिडके आणि कमलेश तिडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले. दरम्यान, चेतन तिडके आणि कमलेश तिडके यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. रात्रीच्या सुमारास अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून, पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Gavkari Admin

Recent Posts

देवस्थान दस्तनोंदणी पूर्ववत करा

आमदार सरोज आहिरेंची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी देवळाली मतदारसंघातील विहितगाव, बेलतगव्हाण, मनोली गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनींची…

10 minutes ago

सप्तशृंगगडावर व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारणार

वन विभागाकडून दोन एकर जागा मिळवणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कळवण : प्रतिनिधी सप्तशृंगगड येथील ग्रामस्थांना…

22 minutes ago

मालेगावला मनपात शिक्षकांची बोगस भरती

आ. मौलाना मुक्ती; दहा कोटींच्या फरकाची रक्कम काढल्याचा विधिमंडळात आरोप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव महापालिका…

28 minutes ago

मोबाईल हिसकावून चोरी करणार्‍या तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सिडको : विशेष प्रतिनिधी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हिसकावून पळ काढणार्‍या आरोपींचा छडा लावत…

38 minutes ago

राणेनगर रस्ता रुंदीकरणास प्रारंभ

काम पूर्ण होण्यास लागणार सहा महिने सिडको : विशेष प्रतिनिधी राणेनगर परिसरातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम…

48 minutes ago

नांदगावला विहिरीतील बिबट्याचे रेस्क्यू

विंचूर/निफाड : विशेष प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले…

53 minutes ago