नाशिक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन निश्चितीचा प्रयत्न

11 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कोणताही अधिकृत पत्रव्यवहार किंवा मान्यता ठराव सादर केलेला नसताना बनावट कागदपत्रे तयार करून वेतन निश्चितीसाठी प्रयत्न केल्याप्रकरणी 11 शिक्षकांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारातून संस्थेची तसेच शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प येथील शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमध्ये हा प्रकार 2001 ते 25 मार्च 2022 या कालावधीत झाल्याचा आरोप आहे. संस्थेचे सचिव रतन राजलदास चावला यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित शिक्षकांनी वेतन निश्चितीसाठी जिल्हा परिषद, नाशिक तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे कोणताही अधिकृत पत्रव्यवहार अथवा मान्यता ठराव सादर केलेला नसतानाही बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे शाळा आणि शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पूनम समीर मुखर्जी, प्रज्ञा राजे, मनमोहन श्याम हेमनानी, लक्ष्मण यशवंत मुसळे, विश्वभरी पंजुमल दौलतानी, प्रियंका विजय आहुजा, सविता अर्जुनसिंग आडवाणी, भाग्यश्री संजय हिरे, शरू प्रकाश कुलकर्णी, शोभा तानाजी दुमणे आणि सुजाता श्रीकृष्ण ठाकूर यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

Attempt to fix salary based on forged documents.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago