महाराष्ट्र

सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचा मोठा वाटा

भुजबळ : तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा यांना ’जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान

मुंबई : प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘आदिवासी संस्कृती उत्सव-वनरंग 2026’चे शानदार आयोजन करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकाराने आयोजित या विशेष कार्यक्रमात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवत आदिवासी समाजाच्या समृद्ध कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे कौतुक केले. भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचा मोठा वाटा असून, हा वारसा जतन करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या महोत्सवात आदिवासी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पद्मश्री आणि तारपावादक भिकल्या धिंडा यांना अत्यंत मानाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त प्रशासकीय अधिकारी डॉ. अनबलगन पी., गिर्यारोहक अनिल वसावे आणि सामाजिक कार्य करणारी स्वदेश फाउंंडेशन यांना ‘आदिवासी भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘नवरंग’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले, तसेच पारंपरिक लोकसंगीत, तारपा नृत्य आणि हस्तकलेच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.
लढा प्रेरणादायी
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समाजाच्या अतुलनीय योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. बिरसा मुंडा, तंट्या भिल आणि राघोजी भांगरे यांसारख्या थोर क्रांतिकारकांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आणि जल, जंगल, जमीन यांच्या रक्षणार्थ आदिवासींनी दिलेला लढा आजही आपल्या सर्वांसाठी अत्यंत
प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रिया बेर्डे, पद्मश्री राहीबाई पोपरे, माजी खासदार हिना गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोककला, परंपरेचे संवर्धन करावे
आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि विकासाची कास धरतानाच आदिवासी बांधवांनी आपली मूळ भाषा, लोककला आणि परंपरा यांचेही संवर्धन करावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. ’वनरंग-2026’ सारखे स्तुत्य उपक्रम आदिवासी संस्कृती आणि त्यांचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतील, असा सार्थ विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, देशभरातील आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेशही त्यांनी दिला.

The tribal community plays a significant role in cultural shaping.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

17 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago