नाशिक

‘पार्टी’साठी पैसे न दिल्याने चॉपरचा धाक दाखवून चालकाला लुटले

सिडको : प्रतिनिधी
‘पार्टी करण्यासाठी पैसे दे’ अशी मागणी करून पैसे देण्यास नकार दिल्याने चॉपरचा धाक दाखवत चालकाकडून एक हजार 250 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना पाथर्डी गाव परिसरात घडली. यावेळी तिघांनी चालकाला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशाल पांडुरंग बांडे (वय 39, व्यवसाय चालक, रा. मारुती मंदिर परिसर, पाथर्डी गाव) हे मनपा शाळेजवळील परिसरात होते. त्यावेळी स्वप्नील सोनकांबळे, सिद्धार्थ गरुड आणि यश धांडे यांनी त्यांच्याकडे ‘पार्टी करण्यासाठी पैसे दे’ अशी
मागणी केली.
बांडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर स्वप्नील सोनकांबळे याने कमरेला असलेला चॉपर काढून बांडे यांच्या मानेवर लावला आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर यश धांडे आणि सिद्धार्थ गरुड यांनी फिर्यादी बांडे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर स्वप्नील याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून 1 हजार 250 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान, बांडे यांच्या पत्नीला धक्का देऊन खाली पाडण्यात आले. तसेच शेजार्‍यालाही चॉपरचा धाक दाखवून धमकावण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी भीतीपोटी दुकाने आणि घरांचे दरवाजे बंद करून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Driver robbed at knifepoint after refusing to pay for a ‘party’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago