नाशिक

आडगावला तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न

मिसफायरमुळे अनर्थ टळला

पंचवटी : प्रतिनिधी
आडगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलजवळील पुलाखाली रविवारी (दि. 18) दुपारी जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने पिस्तुलातून दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा शस्त्र मिसफायर झाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत फिर्यादी उमेश ऊर्फ कैलास माळोदे बचावले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राहुल आंबेकर याने माळोदे यांच्यावर पिस्तुलातून दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने माळोदे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी संशयित राहुल आंबेकर आणि माळोदे यांची पत्नी एकाच कंपनीत काम करत होते. त्यावेळी संशयिताकडून पत्नीला त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. यावरून माळोदे यांनी संशयिताला जाब विचारला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीने संबंधित कंपनीतील काम सोडले होते. याच वादातून संशयिताने रविवारी माळोदे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एकूण दोन संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही संशयित नाशिक रोड-जेलरोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांची पथके रवाना

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे आणि पोलीस हवालदार नीलेश काटकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मिसफायर झालेल्या पिस्तुलातील दोन्ही कॅप ताब्यात घेतल्या आहेत. संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

Attempted shooting of a youth in Adgaon

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

5 minutes ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

13 minutes ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

21 minutes ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

31 minutes ago

यूपीएससीच्या स्वप्नाचा प्रवास धरणाच्या पाण्यात

डोणगावच्या पंचवीसवर्षीय राहुलचा मृत्यू चांदवड : प्रतिनिधी मुलाने मोठे होऊन अधिकारी व्हावे आणि गरिबी दूर…

45 minutes ago

पाच एकर द्राक्षबागेची धुरा सांभाळत यशस्वी शेती

नवरात्रोत्सव : नैताळेच्या रूपाली बोरगुडे यांची यशोगाथा निफाड : अण्णासाहेब बोरगुडे नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर…

51 minutes ago