डिझेल पंपाजवळच थरार! रात्री रस्त्यात बंद पडली, सकाळी डेपोत पेटली
सिन्नर : प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या जुन्या बसेस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत का, असा प्रश्न सिन्नरमध्ये घडलेल्या घटनेने उपस्थित केला आहे. शनिवारी रात्री रस्त्यात बंद पडलेली कोपरगाव आगाराची ‘हिरकणी’ बस टोईंग करून सिन्नर आगारात आणली होती. रविवारी सकाळी सुमारे 10 वाजता या बसने अचानक पेट घेतला.
आगारातील डिझेल पंपापासून अवघ्या 100 फुटांवर आग लागल्याने कर्मचार्यांची धावपळ उडाली. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
नाशिकहून कोपरगावकडे जाणारी बस (एमएच 09 ईएम 1625) शनिवारी रात्री भिकुसा हायस्कूलजवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. प्रवाशांना उतरवून बस टोईंग करून सिन्नर आगारात आणण्यात आली. रविवारी सकाळी बस बाजूला करत असताना तिच्या दर्शनी भागातून धूर निघू लागला. काही क्षणांतच चालकाचे केबिन आणि प्लास्टिक साहित्याने पेट घेतला.
कर्मचार्यांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली.
जुन्या शिवशाहीचे ‘हिरकणीत’ रूपांतर; सुरक्षिततेचे काय?
एसटी महामंडळाच्या जुन्या शिवशाही बसेसचे रूपांतर करून ‘हिरकणी’ म्हणून त्या सेवेत आणल्या जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या बसेस वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी असतानाच आता आग लागल्याच्या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धावत्या बसला आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे जुन्या बसेसची तांत्रिक तपासणी करून धोकादायक वाहने सेवेतून हटवावीत, अशी मागणी प्रवाशांकडून
होत आहे.
Fire breaks out in a ‘Hirkani’ bus at the Sinnar depot
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…
डोणगावच्या पंचवीसवर्षीय राहुलचा मृत्यू चांदवड : प्रतिनिधी मुलाने मोठे होऊन अधिकारी व्हावे आणि गरिबी दूर…
नवरात्रोत्सव : नैताळेच्या रूपाली बोरगुडे यांची यशोगाथा निफाड : अण्णासाहेब बोरगुडे नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर…