नाशिक

अंगारकीनिमित्त नवश्या गणपतीला मोगर्‍याच्या फुलांची आकर्षक आरास

नाशिक : प्रतिनिधी
अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त गंगापूर रोड येथील नवश्या गणपती मंदिरात मंगळवारी (दि. 5) 151 किलो मोगर्‍याच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर सुगंधित झाला होता. अंगारकीचा योग असल्याने पहाटेपासूनच गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
नवश्या गणपती ट्रस्ट मंदिरात पहाटे चार वाजता श्रींना महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकड आरती झाली. सकाळी 2,100 सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. अंगारकीचे औचित्य साधून मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. अनेक भाविकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
अंगारक संकष्ट चतुर्थीमुळे सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भरउन्हातही भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहत श्रींचे दर्शन घेतले. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर उपवासाचे पदार्थ महाप्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आले. अध्यक्ष राजू जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या पालखीची मिरवणूक परिसरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पालखीचे स्वागत केले. अजय कदम यांनी पालखीचे भोईत्व केले. ढोल-ताशांच्या गजरात व ’गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी श्रींचे दर्शन घेत अंगारकीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.

Attractive decoration of mogaria flowers for the new Ganesha on the occasion of Angaraki

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago