13 वर्षांनंतर पथकाची नियुक्ती, पोलिस संरक्षणात कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यापुढे गोदावरी नदीकाठावर कपडे, भांडे, वाहने व जनावरे धुण्यासह प्लास्टिक कचरा टाक णार्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, 13 वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची आता अंमलबजावणी होणार आहे.
हे पथक गोदावरी नदीकाठावर नियमित पेट्रोलिंग करून प्रदूषण करणार्यांविरोधात जास्तीत जास्त कारवाई करणार आहे. त्यांसदर्भात कारवाईचा अहवाल दरमहा पोलिस आणि महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. महापालिकेने आधीच गोदावरी स्वच्छतेसाठी ऐंशी कर्मचारी खासगीकरणातून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोदावरीत प्रदूषण करणार्यांविरोधात आता दंडात्मक कारवाईला वेग येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी 13 वर्षांनंतर पोलिस संरक्षण मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दक्षिण गंगा म्हणून गोदावरीचे महत्त्व आहे. त्यात नाशिककरांसाठी धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. मात्र, सध्या नदीकाठी मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक व गाळ साचल्याने दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणासंदर्भात याचिकाकर्ते राजेश पंडित यांच्या जनहित याचिकेवर 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नदी व उपनद्यांची स्वच्छता राखण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पोलिसांच्या मदतीने गोदावरी प्रदूषण प्रतिबंध पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी याबाबत कारवाईसाठी पथके नियुक्त केली असली, तरी पोलिसांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र, गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी पथकाच्या नियुक्तीच्या निर्णयाचे गोदाप्रेमींसह नाशिककरांनी स्वागत केले आहे.
असे असणार पथक
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा गंभीरपणे घेत, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. त्यानुसार पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी गोदावरी प्रदूषण प्रतिबंध पथक नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यासाठी दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, पाच पोलिस उपनिरीक्षक, 20 अंमलदारांचे पथक नियुक्तीचे पत्र महापालिका आयुक्तांकडे पाठविले आहे.
It’s not good for those polluting Godavari.
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…
सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…