नाशिक

मकरसंक्रांतीसाठी आकर्षक पतंग बाजारात उपलब्ध

नाशिक : माधुरी पोटकुळे

नाशिक शहरात मकरसंक्रांतीची तयारी जोरात सुरू आहे. सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तीळगूळ, लाडू, चिक्की, वाणाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला बाजारात येत आहेत. पतंग खरेदी करून लहान मुले व तरुणाई पतंग उडवण्यासाठी उत्सुक आहे. घराच्या छतावर आणि मोकळ्या जागेत पतंग उडवण्याची तयारी करत आहेत. विविध ठिकाणी दुकानदारांनी नवीन रंगीबेरंगी पतंग बाजारात आणले आहेत.


साधा कागदी पतंग : 5 ते 15 रुपये मध्यम आकाराचे पतंग : 20 ते 40 रुपये डिझायनर

प्रिंट पतंग : 20 ते 40 रुपये मोठे आणि खास पतंग : 150 ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

विक्रेत दिलीप सोनवणे म्हणाले की, यावर्षी चांगल्या व दर्जेदार पतंगांना मागणी आहे.

मकर संक्रांतीसाठी आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने अनेक ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत. सणाच्या काळात दरवाढ झाल्यामुळे मध्यमवर्गीयांना आर्थिक अडचणी येतात. संक्रांत सण साजरा करण्यासाठी विविध वस्तू, तसेच यावर्षी पतंगावर देशाचा तिरंगा, विविध प्रकारची चित्रे, कार्टूनचे फोटो असलेेले पतंग, विविध आकाराचे पतंग उपलब्ध आहेत.
– दिलीप सोनवणे, पतंग विक्रेते

लहान मुलांपासून तरुणांपर्यंत मकरसंक्रांतीची सर्वांना उत्सुकता आहे. रंगीबेरंगी पतंग, आकर्षक डिझाइनचे पतंग बाजारात आणले आहेत. मकरसंक्रांतीसाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नाशिकमधील सराफ बाजार, मेनरोड, पंचवटी या भागांतील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहाने पाळली जाते. मकरसंक्रांत हा सण केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक सलोखा वाढवणारा आहे. ’तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ यातून आपुलकी, प्रेम आणि सुसंवादाचा संदेश दिला जातो. मकरसंक्रांत सणाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाकडून नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. यावर्षी कुणी या मांजाचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पतंग, त्यावर काढलेले चित्र अतिशय उत्तम प्रकारे यावर्षी पतंग बनविले आहेत. विविध रंगांतील, तसेच आकाराचे पतंग बनवण्यात आले आहेत. संगीत, ढोल-ताशांचा गजर आणि मित्रपरिवारासोबत हा सण साजरा करण्याची तयारी जोरात सुरू आहे. यावर्षी कागद व बांबूच्या काड्यांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे पतंगाच्या भावात वाढ झालेली दिसत.

 

Attractive kites available in the market for Makar Sankranti

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago