नाशिक

‘उद्यान’सह लेखापरीक्षणावर गैरव्यवहाराचे ताशेरे

होर्डिंग्जप्रकरणी महापौरांचे फौजदारी कारवाईचे आदेश; उद्यान विभागाला 10 दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : प्रतिनिधी
मनपाच्या उद्यान विभागातील अनागोंदीवर सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी गैरव्यवहाराचे केलेले आरोप पाहता महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी उद्यान विभागाची सदस्यांनी मागितलेली माहिती दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. लेखापरीक्षण विभागाच्या कारभारावर महापौरांनी ताशेरे ओढत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सीएंची नियुक्ती करून समिती नेमण्याचे निर्देश देत डिसेंबर 2027 पर्यंत लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. लेखापरीक्षणाने याकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा महापौर आडके यांनी दिला. याशिवाय शहरात दिशादर्शक फलक लावणार्‍यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशही महापौरांनी दिले.
नाशिक महापालिकेची महासभा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.6) पार पडली.यावेळी उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, नगरसचिव संजय नेरकर आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. महासभा सुरू होताच प्रथम प्रश्नोत्तरे घेण्यात आली. शहरात अनधिकृत होर्डिर्ंग्ज व दिशादर्शक फलकावरून सदस्यांनी लक्ष वेधले असता, महापौरांनी अनधिकृत फलक लावणार्‍यांविरोधात कारवाई करावी. दिशादर्शक फलक हा प्रवाशांना माहिती देण्यासाठी आहे. शहरात कुठेही दिशादर्शक फलकांवर होर्डिर्ंग्ज असेल, तर संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
गुरुमित बग्गा यांनी लेखापरीक्षणकडे रोख करत या विभागाने ऑडिट न केल्याने
महापालिकेचे अडीच कोटीचे नुकसान झाल्याचा आरोप केला. बारा हजारांहून अधिक लोकांना नळकनेक्शन दिले, परंतु त्यांना देयकेच दिली नसल्याचा दावा केला. घरपट्टी व पाणीपट्टीची हजार कोटींची वसुली करण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रकरणी महापौरांनी लेखापरीक्षण विभागाला निर्देश देत संबंधित विभागाने तातडीने समिती नेमून ऑडिटचे प्रश्न मार्गी लावावेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केसस्टडी करावे. व सभागृहाला डॉक्युमेंट प्रझेंटेशन करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. नगरसेवक दिनकर पाटील यांनी सिटीलिंक व उद्यान विभागात अनियमितता असल्याचा आरोप करत उद्यानने 2022 पासून ते आतापर्यंत कामाची माहिती सादर करण्याची मागणी केली. शिंदेसेनेचे नगरसेवक कैलास मुदलियार यांनी उद्यानच्या कारभारावर थेट आरोप केले. बेंच घेण्यासाठी विशिष्ट ठेकेदाराचाच आग्रह का केला जातो? हा ठेकेदार एक बेंच 21 हजारांना विक्री करत असून, याच बेंचची किंमत बाजारमूल्यानुसार दहा ते बारा हजार रुपये असल्याचा दावा केला. बेंचप्रमाणे इतर साहित्यात अव्वाच्या सव्वा दर देऊन प्रशासनाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आले.

फेरनिविदा कोणासाठी? : बडगुजर
सुधाकर बडगुजर यांनी उद्यान विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत निविदेसाठी बारा मक्तेदार आले असतानाही त्यांनी फेरनिविदा का घेतली? असा सवाल केला. सदस्यांनी उद्यान विभागाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली.

पुढचा पाठ मागचा सपाट नको : महापौर आडके
लेखापरीक्षण विभागाच्या कारभारावर बोलताना महापौर म्हणाल्या, की मनपाची आर्थिक स्थिती सक्षम राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. करातून मिळणार्‍या पैशांतून प्रभागात विकासकामे होतात, परंतु हाच कर योग्यरीत्या जमा झाला नाही, तर अडचण होऊ शकते. त्यामुळे पुढचा पाठ मागचा सपाट असे होऊ नये याकडे लेखापरीक्षण विभागाने लक्ष देण्याच्या सूचना महापौर आडके यांनी केल्या.

डॉ. हेमलता पाटील यांचा सभात्याग
डॉ. हेमलता पाटील यांनी सभात्याग केला. दरम्यान, महापौरांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत केला असता, त्या न थांबता निघून गेल्या. महासभेत बोलण्यासाठी संधी मिळत नसल्याने बरेच सदस्य नाराजी व्यक्त करत असल्याचे चित्र आहे.

Audit report slams irregularities involving ‘Udyan’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

निफाडच्या बनावट नोटा प्रकरणातील संशयिताला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

निफाड : तालुका प्रतिनिधी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये…

20 minutes ago

मुलींना अश्लील व्हिडीओ पाठवून धमकावणारा जेरबंद

अंबड गुन्हे शाखा युनिट तीनची यशस्वी कारवाई सिडको : प्रतिनिधी वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्‍या मुलींना…

25 minutes ago

परवाना नसलेल्या रॅपिडोर्र्, उबरच्या ई-बाईकवर कारवाई

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या…

30 minutes ago

मतभेदाच्या नावाखाली सरकार पाडले, हेच पक्षांतर!

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : प्रतिनिधी…

39 minutes ago

खुनातील आरोपीच्या निर्घृण हत्येचा प्रयत्न

पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार पुणे : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4…

48 minutes ago

‘स्वीकृत’ने उघडी पाडलेली सत्तालालसा!

- सचिन अहिरराव नाशिक महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्यांवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. पण त्याआधी बरीच…

53 minutes ago