नाशिक

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात

आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर

मनमाड : प्रतिनिधी

शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज पुन्हा एकदा एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. येथील संत बार्णबा शाळेसमोर आयशर ट्रकखाली सापडल्याने एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला पाच वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे मनमाड शहरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. कोमल पगारे असे मृत तरुणीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असेंकी आज (बुधवारी) पुण्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या एका आयशर ट्रक (क्रमांक: UP 25 FT 2249) समोर अचानक कोमल पगारे ही तरुणी आली. वाहनचालकाने तातडीने ब्रेक लावून तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र वेगातील ट्रकवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कोमल ही ट्रकखाली तब्बल ५० ते ६० फूट घसरत गेली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.अपघाताच्या वेळी कोमलसोबत असलेला पाच वर्षांचा लहान बालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी जखमी बालकाला तात्काळ मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक कोंडी सुरळीत केली.

महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’, नागरिकांचा संताप
हा महामार्ग सध्या वाहनधारकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघात घडलेल्या भागात संत बार्णबा शाळा असून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची येथे सतत वर्दळ असते. या परिसरात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीने (NHAI) त्वरित गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आक्रमकपणे केली आहे. “नॅशनल हायवे अथॉरिटी अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

Horrific accident on the Manmad-Indore-Pune highway

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

निफाडच्या बनावट नोटा प्रकरणातील संशयिताला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

निफाड : तालुका प्रतिनिधी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये…

10 minutes ago

मुलींना अश्लील व्हिडीओ पाठवून धमकावणारा जेरबंद

अंबड गुन्हे शाखा युनिट तीनची यशस्वी कारवाई सिडको : प्रतिनिधी वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्‍या मुलींना…

15 minutes ago

परवाना नसलेल्या रॅपिडोर्र्, उबरच्या ई-बाईकवर कारवाई

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या…

20 minutes ago

मतभेदाच्या नावाखाली सरकार पाडले, हेच पक्षांतर!

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : प्रतिनिधी…

29 minutes ago

खुनातील आरोपीच्या निर्घृण हत्येचा प्रयत्न

पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार पुणे : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4…

38 minutes ago

‘स्वीकृत’ने उघडी पाडलेली सत्तालालसा!

- सचिन अहिरराव नाशिक महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्यांवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. पण त्याआधी बरीच…

43 minutes ago