नाशिक

अंबडच्या दूषित पाणीप्रश्नी यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर

नागरिकांच्या आरोग्यासाठी मनपाचा व्यापक कृती आराखडा

नाशिक : प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील दत्तनगर, चुंचाळे शिवार आणि लगतच्या निवासी भागांत आढळलेल्या दूषित भूजलाच्या समस्येवर नाशिक महानगरपालिकेने तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपायांसाठी व्यापक कृती आराखडा हाती घेतला आहे. नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, प्रदूषणाचा नेमका स्रोत शोधणे आणि भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, या उद्देशाने महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्यात समन्वय साधण्यात येत आहे.
मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी 1 ऑक्टोबर रोजी प्रभावित परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांना तातडीने दिलासा देण्याचे आणि प्रदूषणास जबाबदार आढळणार्‍या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रभावित परिसरातील नागरिकांना बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी महानगरपालिकेने टँकरची संख्या वाढविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मोठ्या निवासी सोसायट्या आणि गरज असलेल्या भागांत 2,000 ते 5,000 लिटर क्षमतेच्या अतिरिक्त सिन्टेक्स पाणी साठवण टाक्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. टँकरद्वारे त्या भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विद्यमान नळजोडण्या अपुर्‍या असलेल्या ठिकाणी सदनिकांच्या संख्येनुसार योग्य क्षमतेच्या नळजोडण्या देण्यात येत आहेत. आवश्यक ठिकाणी नवीन नळजोडण्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. दत्तनगर जलकुंभावरून होणार्‍या पुरवठ्यात सुधारणा करत शुक्रवार सायंकाळच्या सत्रात बूस्टरसह वाढीव पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दूषित भूजलाच्या तक्रारींसोबतच परिसरातील नागरिकांकडून त्वचाविकाराच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने नियमित आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू केले आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत एकूण 248 नागरिकांची तपासणी मनपाचे वैद्यकीय अधिकारी आणि त्वचारोग तज्ज्ञांमार्फत करण्यात आली आहे. तपासणीत प्रामुख्याने सौम्य व मध्यम स्वरूपाच्या, अ‍ॅलर्जीशी संबंधित त्वचेच्या तक्रारी आढळल्या आहेत. तथापि, या तक्रारी आणि बोअरवेलचे पाणी यांचा थेट कारणसंबंध अद्याप निश्चित झालेला नसून आवश्यक वैद्यकीय व प्रयोगशाळा तपासणी सुरू आहे. याशिवाय 14 ऑक्टोबर रोजी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. यात मनपाचे वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, त्वचारोगतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन आणि खासगी तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग प्रस्तावित आहे.
बाधित परिसरातील नागरिकांची नियमित तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय देखरेख सुरू ठेवण्यात येणार आहे. औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणार्‍या कॉमन इफेलून्ट ट्रीटमेंट प्लांट प्रकल्पाचा पहिला टप्पा 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाच्या कामाला गती देण्याबरोबरच त्याच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे.

आरती स्ट्रक्चर्सला नोटीस
औद्योगिक परिसरातून प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्‍या रासायनिक सांडपाण्यामुळे भूजल दूषित झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रदूषणाचा नेमका स्रोत निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वैज्ञानिक तपासणी सुरू आहे. 28 सप्टेंबर रोजी आरती स्ट्रक्चर्स प्रा. लि. या औद्योगिक युनिटची तपासणी करून 30 सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित उद्योगाचे सांडपाणी आणि निवासी भागातील भूजलाच्या नमुन्यांची तुलना करून प्रदूषणाचा स्रोत निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नळजोडणीद्वारे पाणीपुरवठ्यात आठपट वाढ
अंबड परिसरातील नागरिकांचे दूषित बोअरवेलच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागरिकांनी मोठ्या क्षमतेची नळजोडणी घेतल्यास सध्या प्रतिकुटुंब प्रतिदिन उपलब्ध होणारा सुमारे 2,000 लिटर पाणीपुरवठा तब्बल 16,000 लिटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपाययोजनेमुळे नागरिकांना महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा अधिक लाभ मिळून दूषित भूजलावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

 

Authorities swing into action over the contaminated water issue in Ambad.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago