नाशिकमध्ये १४ जून रोजी ऑटोमेशन रोड शो; उद्योगांसाठी नवतंत्रज्ञानाचे सादरीकरण”

सिडको विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रातील उद्योगनगरी नाशिक येथे १४ जून २०२५ रोजी ऑटोमेशन रोड शो या विशेष औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ताज गेटवे हॉटेल, एमआयडीसी अंबड, नाशिक येथे सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, प्रवेश पूर्णतः मोफत आहे. या शोद्वारे ऑटोमेशन एक्स्पो २०२५ (११ ते १४ ऑगस्ट, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई) या आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक प्रदर्शनाचा पूर्वावलोकनात्मक अनुभव मिळणार आहे.

IED कम्युनिकेशन्स लिमिटेड या आयोजक संस्थेच्या पुढाकाराने होणाऱ्या या शोमध्ये ऑटोमेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्ज (IIoT) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या रोड शोमध्ये ३० आघाडीच्या कंपन्या त्यांची नविन उत्पादने, प्रणाली आणि उपाय योजना सादर करतील.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे थेट प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण ऑटोमेशन सोल्यूशन्सचा अनुभव. उपस्थितांना थेट उद्योग नेते, नवोन्मेषक, तंत्रज्ञ व तंत्रज्ञान खरेदीदारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उद्योगांमध्ये ऑटोमेशनचा प्रभावी वापर करून कार्यक्षमता, उत्पादकता व शाश्वतता वाढविणे शक्य होईल.

“नेक्सजेन फॅक्टरीज – ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज फॉर सस्टेनेबिलिटी” ही मुख्य संकल्पना असून यामध्ये नाशिकसारख्या औद्योगिक शहराला भविष्यातील प्रगत उत्पादन व्यवस्थेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः एमआयडीसी नाशिक परिसरातील उत्पादन कंपन्यांना हा रोड शो नवे दरवाजे उघडून देईल.

डॉ. एम. अरोकियास्वामी, व्यवस्थापकीय संचालक, IED कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणतात, “हा रोड शो म्हणजे ऑटोमेशन एक्स्पो २०२५ चा एक मौल्यवान झलक आहे. नाशिकसारख्या औद्योगिक शहरात याचे आयोजन हे येथील उत्पादक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. यामुळे त्यांना मुंबईतील मुख्य एक्स्पोमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल.”

नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर, मालेगाव व अन्य परिसरातील ऑटोमोटिव्ह, फार्मा, वाइन, अभियांत्रिकी व अन्य क्षेत्रातील उद्योजक, अभियंते, तंत्रज्ञ व संशोधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“नेक्सजेन फॅक्टरीज: ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज फॉर सस्टेनेबिलिटी” या थीमसह ऑटोमेशन एक्स्पो २०२५ हे प्रदर्शन ११ ते १४ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (BEC) येथे आयोजित करण्यात आले आहे. येथे ८०० हून अधिक प्रदर्शक आपली उत्पादने व सोल्यूशन्स सादर करतील. हे भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्वात मोठे औद्योगिक ऑटोमेशन प्रदर्शन आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

12 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago