नाशिक

निवडणुकीतून ताकद दाखवू; सुजात आंबेडकरांचा हुंकार

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा, कष्टकरीसाठी काम करण्याच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद 2019 नंतरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर कमी झाल्याचे काहीजण म्हणतात. मात्र, वंचित पक्ष पुढार्‍यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झालेली नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक फक्त कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित आपली ताकद दाखवेल, असा विश्वास पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.
परशुराम साईखेडकर सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि.12) करण्यात आले होते. यावेळी सुजात आंबेडकर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महानगरप्रमुख डॉ. अविनाश शिंदे होते. व्यासपीठावर राजेंद्र पातोडे, दिशा पिंकी, चेतन गांगुर्डे, अरुण जाधव, वामनदादा गायकवाड, शभिमाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, युवा जिल्हाप्रमुख दामोदर पगारे, रवी पगारे, दीपक पगारे, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, संदीप काकळीज, सुनील साळवे, रेखा देवरे आदींसह उपस्थित होते. सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, ऑक्टोबरमध्ये विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पक्षाने आपली रणनीती बदलली आहे. यापूर्वी पक्षाची राष्ट्रीय कमिटी नव्हती, ती आता तयार केली आहे. जसे बदल वरच्या पातळीवर झाले. तसेच बदल खालच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्यासाठी काम करायचे आहे. यासाठी वंचितचा कार्यकर्ता शहरातल्या प्रत्येक गल्लीत, खेड्यातल्या प्रत्येक गावात, वाड्यावर असणे आवश्यक आहे. जोपर्यंत तळागाळात आपण जात नाही, तोवर पक्ष ग्राउंड लेव्हलवर जाऊ शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, सुजात आंबेडकर यांना ऐकण्यासाठी परशुराम साईखेडकर सभागृह भरून बाहेर गर्दी झाल्याचे चित्र होते.

पक्षवाढीसाठी महत्त्वाचा संदेश

सेल्फी काढून आणि सोशल मीडियावर फोटो टाकून पक्ष चालत नाही. तळागाळात जाऊन जनसामान्यांचे, पीडितांचे प्रश्न तुम्ही जोवर सोडवणार नाही, तोवर पक्षाची वाढ होणार नाही. त्यामुळे पक्षवाढीसाठी काय महत्त्वाचे आहे हे पाहून काम करण्याचा महत्त्वाचा सल्ला सुजात आंबेडकर यांनी दिला. त्यास उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.

आंबेडकरांनी ‘तो’ दावा खोडून काढला

‘वंचित’ची ओळख आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी हेच मुद्दे हाती घेतल्याचा शिक्का मारला जातो. परंतु, वंचितने आतापर्यंत 2023 चा गायरानबाबतचा मोर्चा, अदानीकडून इलेक्ट्रिसिटीच्या कामास विरोध, कंत्राटी भरती, खासगीकरण, ओबीसी, एसटी आरक्षण यांसह राज्यातील अनेक मुद्यांवर एकट्या वंचितने आंदोलने व मोर्चे काढल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले. मात्र, आपले काम शेवटच्या घटकापर्यंत जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago