बबनराव घोलप ठाकरे गटाला देणार धक्का?

बबनराव घोलप ठाकरे गटाला देणार धक्का?
नाशिक: संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले माजीमंत्री बबनराव घोलप हे ठाकरे गटाला धक्का देण्याची शक्यता आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघात एकीकडे भानुदास वाकचौरे हे पुन्हा ठाकरे गटात सहभागी झाले असतानाच घोलप हे शिर्डी मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते, त्यातच उद्धव ठाकरे यांनी घोलप यांना संपर्क प्रमुख पदावरून हटऊन त्यांच्या जागी दुसरा संपर्क प्रमुख नियुक्त केला, त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे  उपनेते पदचा राजीनामा पाठवल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात प्रारंभी फारसा फरक पडला नाही, मात्र त्यानंतर खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आमदार नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले, आता बबन राव घोलप काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago