नाशिक

गोंदे ते पिंप्रीसदोदरम्यान वाहतूक कोंडी अन् अपघात

मुंबई महामार्गाचे काम संथगतीने : वाहनधारकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

इगतपुरी : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे ते पिंप्रीसदोदरम्यान दोन्ही मार्गिकेवर तीन पदरीकरणाचे काम एकाचवेळी संथगतीने सुरू आहे. मात्र, सुरू असलेल्या कामाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणात दररोजचे अपघात घडत असून, शेकडो नागरिक जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले आहेत.
दररोज वाहतूक कोंडी व अपघात होत असतानाही काम करणारी यंत्रणा प्रवासी व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना करीत नाहीत, संबंधित प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांमध्ये होत आहे. गोंदे ते वडपदरम्यान कार्यरत असलेली इगतपुरी हायवे कंपनीही संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत एकाच ठिकाणावरील काम पूर्ण करण्याऐवजी दोन्ही बाजूंनी जागोजागी खोदाई करून ठेवल्यामुळे व वाहनधारकांसाठी कुठलेही सूचनाफलक न लावल्याने वाहने थेट खोदाई केलेल्या खड्ड्यामध्ये कोसळतात. गोंदे, पाडळी, मुंढेगाव व बोरटेंभे येथे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. यामुळे अपघात व वाहतूक कोंडीचा रोज सामना वाहनधारकांना करावा लागतो. या उड्डाणपुलांच्या कामामुळे रविवारी (दि. 15) सकाळच्या वेळेत पाडळी फाट्याजवळ खोदाई केलेल्या खड्ड्यामध्ये एक चारचाकी वाहन जाऊन आदळले, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनातील प्रवासी जखमी झाले असून, वाहनाचे मोठे नुकसान
झाले आहे.
याबाबत काम करणार्‍या यंत्रणेला विचारणा केली असता त्यांनी मात्र वाहनधारकांचीच चूक असल्याचे सांगून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. केपीजी महाविद्यालयासमोर असलेल्या पादचारी पुलाच्याखाली रस्ता उंच केल्याने मोठे कंटेनर या पादचारी पुलाखाली अडकत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. असे असताना लोकप्रतिनिधीही यावर गप्पच असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम करणार्‍या यंत्रणेने तत्काळ सुधारणा न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून देण्यात आला आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

17 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

2 days ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

2 days ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

2 days ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

2 days ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

2 days ago