सिडको : विशेष प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्या आरोपीला ठाणे शहरातून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट क्र. 1 नाशिक शहराच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
फिर्यादी प्रकाश मारूती पवार (वय 55, रा. श्रीसंकुल हौसिंग सोसायटी, पांडवनगरी, कामटवाडे शिवार, नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर कोळी आणि तेजस कोळी (रा. ओम साई समर्थ, कार्तिकेयनगर, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) नाशिक यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी तेजस कोळी हा ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
सदर माहिती वरिष्ठ अधिकार्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक ठाणे शहरात रवाना झाले. पथकाने 18 जून 2025 रोजी रात्री 8.15 वाजता सुजाता बिल्डिंग, वागळे इस्टेट परिसरात सापळा रचून तेजस मधुकर कोळी (वय 30, रा. कार्तिकेयनगर, नाशिक) याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्र. 1 नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. या पथकात सपोनि हिरामण भोये, पोउनि सुदाम सांगळे, पोहवा प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, नाजीमखान पठाण, महेश साळुंके, रोहिदास लिलके, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे आणि पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांचा समावेश होता.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…