हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी पुन्हा १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी पुन्हा १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ  परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी काढले प्रसिद्धीपत्रक

पंचवटी : सुनील बुनगे
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत निर्देश देण्यात आले होते. त्यास मुदतवाढ देऊन ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचेही आदेश काढले होते. परंतु जुन्या वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्याचे काम कमी झाले झाल्याने नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार त्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे प्रसिद्धीपत्रक परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी काढले आहेत.
वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट ( उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी) बसविणे आवश्यक आहे. १.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१ मार्च २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी संदभर्भीय परिपत्रक क्रमांक २ अन्वये ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसविणे बाकी असल्याने HSRP बसविण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. त्यानुसार परिपत्रकाद्वारे दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बर्सावण्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) न बसविणा-या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे .दि. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचेही परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान सर्व सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा / टॅक्सी बस ट्रक यांच्या संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे.

१५ ऑगस्ट २०२५ अंतिम मुदत

दि. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) नंबर प्लेट बसविण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) न बसविणा-या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे .दि.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago