खरीप हंगामासाठी पैसे नसल्याने बळीराजा हतबल

यांत्रिकीकरणामुळे मशागत खर्चात वाढ, सोसायटीतून कर्जपुरवठा करावा

अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
भाताचे आगार समजल्या जाणार्‍या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. मात्र, पुढील नियोजनासाठी पैसे शिल्लक नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीफण, पाबर, कोळप आदी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवली जात होती. मात्र, आता त्या पद्धतीचे गावोगावी कारागीर राहिले नसल्याने शेतकरी आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. महागाईमुळे औजारानादेखील अडीच ते तीन हजार खर्च येत असल्याने शेतकर्‍यांच्या खिशाला परवडणारे नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कालौघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला.
ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये भाव एकरी मोजावा लागतो. काही आदिवासी भागात शेतजमिनीची मशागत पारंपरिक पद्धतीने केली जाते. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्याच्या महसुली गावात अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन मशागतीची कामे केली जातात. मात्र, अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांकडे जमीन मशागतीसाठी पैसेच नसल्याने हतबल झाले आहेत. अशातच बाजारात मशागतीच्या औजारांना मागणी वाढली आहे. एखाद्या योजनेची अंमलबजावणी करावी, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकर्‍यांची भटकंती सुरू आहे. घेतलेल्या बागाईत पिकालाही कवडीमोल भाव व अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खरीप पेरणीसाठी पैसे उपलब्ध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. बी-बियाणे, कोळपणी, नांगरणीसाठी शासनाने एकरी वीस हजारांची सरसकट आर्थिक मदत करावी. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्जपुरवठा करावा.
– योगेश सुरुडे, व्हाइस चेअरमन, देवळे कार्यकारी सोसायटी

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago