नाशिक

डिझेलसाठी बळीराजाची वणवण; पेट्रोलपंपांवर रांगा

शेतीची कामे रखडली; इंधन न मिळाल्यास शेतीच्या नुकसानीची भीती

मनमाड : प्रतिनिधी
सध्या सोशल मीडियावर व टीव्ही चॅनलद्वारे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर वाहनात इंधन भरण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यांना डिझेल घेण्यासाठी तासन्तास पेट्रोलपंपांवर रांग लावून बसावे लागत आहे.
मुळात सध्या शेतीचे काम सुरू असून, काही ठिकाणी पाऊस पडला आहे. यामुळे बळीराजा कामाला लागला असून त्यांना हे काम करण्यासाठी डिझेल लागते. मात्र डिझेल मिळत नसल्याने
शेतीची काम रखडली आहेत.
पेट्रोलपंप मालकाकडून लोक पॅनिक होऊन गर्दी करत असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या शेतीच्या मशागतीचा हंगाम जोरात सुरू असतानाच डिझेलच्या टंचाईने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक भागांतील पेट्रोलपंपांवर डिझेल घेण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रचंड रांगा लागल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. हातातील महत्त्वाची कामे सोडून शेतकरी पहाटेपासूनच कॅन घेऊन पंपावर ठाण मांडून बसले आहेत. डिझेलअभावी ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्री बंद पडल्याने पेरणीपूर्व मशागत आणि इतर कामे खोळंबली आहेत, ज्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.या परिस्थितीत पेट्रोलपंप चालकांकडून वेगळाच दावा केला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये, असे आवाहन पंप चालकांकडून करण्यात येत आहे. मात्र, तासन्तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतीकामासाठी आवश्यक असलेला डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वेळेत इंधन न मिळाल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या शेतीची मशागत सुरू आहे. शेतीत विविध यंत्रसामग्री चालवण्यासाठी डिझेल, पेट्रोल लागते. मात्र, सध्या राज्यात डिझेलचा तुटवडा आहे. आम्ही सकाळी सहा वाजेपासून पेट्रोलपंपावर रांग लावून बसतो, तेव्हा गाडी आल्यानंतर आम्हाला संध्याकाळी डिझेल मिळते. पेट्रोलपंप मालक जरी म्हणत असले की, मुबलक साठा उपलब्ध आहे, तरीही आम्हाला डिझेल मिळत नाही. यामुळे आमचे शेतीचे नुकसान होत आहे. शासनाने आम्हाला डिझेल उपलब्ध करून द्यावे.
– बाळासाहेब पाटील, शेतकरी

Baliraja’s plea for diesel; Queues at petrol pumps

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

2 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

2 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

2 hours ago