खा. राजाभाऊ वाजेंच्या कौतुकाचे झळकले बॅनर

निष्कलंक, प्रामाणिक खासदार निवडून दिल्याचा उल्लेख

नाशिक : प्रतिनिधी
ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी बुधवारीच आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नसल्याची भूमिका घेतली. त्यांच्या या निर्णयाचे मात्र नाशिक शहरासह सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
दरम्यान, खा. वाजे यांच्या कार्यालयासमोरच अज्ञाताने त्यांच्या कौतुकाचे बॅनर लावत आम्हाला गर्व आहे, आम्ही एक निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार निवडून दिला, एक नाशिककर, अशा आशयाचे बॅनर लावले आहे. सदर बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, याची सर्वत्र चर्चा होत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार शिंदेसेनेच्या गळाला लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, निवडून आल्याच्या पहिल्याच दिवसापासून खा. राजाभाऊ वाजे यांनी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कदापि सोडणार नसल्याची भूमिका मांडली आहे. ज्या ज्या वेळी खासदार फुटीच्या बातम्या माध्यमांत प्रसारित झाल्या, त्यावेळी खा. वाजे यांनी आपण ठाकरेंसोबतच असल्याचे सांगत आले. याशिवाय, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खासदारांची बैठक बोलावली, त्यावेळीदेखील खा. वाजे बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी सहा खासदारांनी ठाकरेंना सोडल्याचे माध्यमांमधून समोर येताच नाशिकच्या शिवसैनिकांचे लक्ष दिल्लीच्या घडमोडींकडे लागले होते. परंतु, पक्षाच्या पत्रकार परिषदेत खा. वाजे हे खा. संजय राऊत यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यांनी पुन्हा आपण कुठेही जात नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसह तसेच त्यांना मतदान करणार्‍या मतदारांनी खा. वाजे यांच्याकडून आम्हाला हाच निर्णय अपेक्षित होता, असे सोशल मीडियावर व्यक्त होत, आमचे मत निष्ठावानालाच गेले, अशी भावना व्यक्त केली गेली. खा. वाजे ठाकरेंसोबत राहिल्याने आणि दाखवलेल्या निष्ठेमुळे त्यांच्या कौतुकाचा बॅनर अज्ञाताने संपर्क कार्यालयासमोर बुधवारी
रात्रीतून लावला.

नाशिकरोडला खा. वाजेंचे होणार जोरदार स्वागत

खा. राजाभाऊ वाजे आज शुक्रवारी (दि.19) सकाळी आठ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सकाळी उतरणार आहेत. त्यांचे यावेळी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांसह समर्थकांकडून वाजतगाजत जोरदार स्वागत केले जाणार आहे.

 

Banners praising MP Rajabhau Vaje have appeared.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *