राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

बंगळुरू सलग दुसर्‍यांदा चॅम्पियन!

आयपीएलमध्ये गुजरात हरले, कर्णधार रजत पाटीदारने रचला इतिहास

नवी दिल्ली :
2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल- 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसर्‍यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने गुजरातचा त्यांच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव केला. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला तो आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली, ज्याने फायनल सामन्यात अर्धशतक ठोकले. कर्णधार रजत पाटीदारने आपल्या नेतृत्वाखाली संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देत इतिहास रचला.

या विजयासोबतच आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा पराक्रम केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनंतर सलग दोन आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा फक्त तिसरा संघ ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एम. एस. धोनी आणि रोहित शर्मा या दिग्गज कर्णधारांनाच आपल्या संघाला सलग दोनदा विजेतेपद मिळवून देता आले होते. आता या एलिट क्लबमध्ये आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारचा समावेश झाला आहे.
सलग दोन आयपीएल ट्रॉफी जिंकून रजत पाटीदारने क्रिकेट जगतात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आरसीबीच्या या बॅक-टू-बॅक विजयामुळे देशभरातील आरसीबीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या धारदार गोलंदाजीसमोर गुजरात टायटन्सची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. निर्धारित 20 षटकांत गुजरातला 8 बाद फक्त 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. वॉशिंग्टन सुंदरने 37 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शुभमन गिल 10 धावांवर, साई सुदर्शन 12 धावांवर आणि जोस बटलर 19 धावांवर बाद झाले. आरसीबीकडून रसिक दर सलामने तीन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
2026 मध्ये गुजरातला 8 बाद 155 धावाच करता आल्या. शुभमन गिल ( 10), साई सुदर्शन (12) व जॉस बटलर (19) हे अपयशी ठरले. पण वॉशिंग्टन सुंदरने 37 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. रसिक सलामने सर्वाधिक तीन, तर जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्याने 4-0-23-1 अशी अप्रतिम स्पेल टाकली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेंकटेश अय्यर व विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. या जोडीने 3.3 षटकांत संघाची फिफ्टी पूर्ण केली आणि ही आयपीएल फायनलमधील सर्वार्ंत वेगवान फिफ्टी
ठरली.

वॉशिंग्टन सुंदरन सावरला
गुजरातचा डाव घरच्या मैदानावर नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल 8 चेंडूंत 10 धावा करून हेझलवूडचा शिकार झाला. रसिक सलाम दार याने आरसीबीकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेताना निशांत संधू 20 (18), राहुल तेवितिया 7 (5) आणि राशिद खान यांना 7 (3) स्वस्तात माघारी धाडले. वॉशिंग्टन सुंदर याने 37 चेंडूंत 5 चौकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद 50 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित 20 षटकात 155 धावांपर्यंत मजल मारली होती.

विराटची मॅच विनिंग खेळी

या धावसंख्येचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यर आणि विराट कोहलीनं पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत गुजरात टायटन्सच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 27 चेंडूंत 62 धावा कुटल्या. व्यंकटेश अय्यर 16 चेंडूंत 200 च्या स्ट्राइक रेटसह 32 धावा करून त्याचे काम करून गेल्यावर देवदत्त पडिक्कल 1 (4), कर्णधार रजत पाटीदार 15 (13) आणि क्रुणाल पांड्या 24 (17) स्वस्तात माघारी फिरले. 91 धावांवर 4 विकेट्स गमावल्यावर विराट कोहलीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. टिम डेव्हिड 17 चेंडूंत 24 धावा करून परतल्यावरही विराट मैदानावर शेवटपर्यंत थांबला. षटकारासह त्याने संघाला विक्रमी जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विराट कोहलीने फायनलमध्ये 42 चेंडूंत 9 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 75 धावांची नाबाद खेळी केली.

आरसीबीची झंझावाती फलंदाजी

156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत आरसीबीने अवघ्या 18 षटकांत 5 बाद 156 धावा करत सामना पाच गडी राखून सहज खिशात घातला. विराट कोहलीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीने 12 चेंडू राखूनच विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

Bengaluru are champions for the second time in a row!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago