नाशिक

वणी-कळवण रस्त्यावर भीषण अपघात;

 पुलाचा कठडा तोडून कार नाल्यात, 5 जण जखमी

दिंडोरी : प्रतिनिधी
सप्तशृंगगडावरून देवीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या कारला दि. 31 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजेच्या सुमारास वणी-कळवण मार्गावरील अहिवंतवाडी शिवारात भीषण अपघात झाला. यात पाच भाविक जखमी झाले. अपघातानंतर कारने पुलाचा कठडा तोडून खाली नाल्यात कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून सहा जण वणीच्या दिशेने प्रवास करीत होते. अहिवंतवाडी परिसरातील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने पुलाचा कठडा तोडला आणि थेट खाली नाल्यात कोसळली. या अपघातात हर्षश्री आहेर (वय 42), देवदास आहेर (वय 47), पुष्कर आहेर (वय 17), गौरव आहेर (वय 13) आणि धोंडाबाई वाळुंज (वय 68, सर्व रा. निफाड) जखमी झाले. काही जखमींच्या डोक्याला मार लागला असून, काहींना हातापायाला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढून मदतकार्य केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार वसंत साबळे करीत आहेत. दरम्यान, नांदुरी- वणी मार्गावर वारंवार होणार्‍या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला साइडपट्ट्यांचा अभाव असून, विशेषतः पुलाजवळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करून अपघातप्रवण ठिकाणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Terrible accident on Wani-Kalvan road; Car falls into drain after breaking bridge, 5 injured

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago