आस्वाद

भूतान एक निसर्गरम्य देश

– पुष्पा गोटखिंडीकर

हिमालयाच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार सौंदर्याने नटलेला, डोंगरदर्‍यांनी वेढलेला ’भूतान’ देश पाहायला मिळणे म्हणजे स्वर्ग सुख उपभोगण्याचा आनंदाचा ठेवाच मिळणे होय. भूतान हा शब्द संस्कृत भाषेतील भू-उत्तान (उंच प्रदेश) या नावावरून तयार झाला असावा. भू म्हणजे जमीन आणि ताण म्हणजे पर्वत यांचे ठिकठिकाणी मिलन होताना भासते. भूतानच्या तीन दिशांना भारत असून, चौथ्या दिशेला चीन आहे. आपला शेजारी असलेला हा देश. आपला भारत देश या भूतानला आपला छोटा भाऊच मानतो. या भूतानला ना रेल्वे ट्रॅक न स्वतःची वायुसेना. झाडेझुडपे आणि पर्यावरणावर प्रेम करणारा हा स्वच्छ सुंदर देश. नो कार्बन, शंभर टक्के ऑक्सिजन त्यामुळे नो पोल्यूशन. प्लास्टिकमुक्त असा देश. तंबाखू विक्रीला येथे बंदी आहे, तर धूम्रपानबंदी असलेला जगातील पहिले राष्ट्र म्हणून याची गणना होते.
भूतानची लोकसंख्या आठ लाख असून, येथे तीन मोठी शहरे आहेत. थिंपू ही भूतानची राजधानी असून, पुनाखा आणि पारो ही इतर दोन मोठी शहरे आहेत. पारो या शहरात एक मात्र आंतरराष्ट्रीय हवाईअड्डा आहे. भूतानला जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते असे नाही, परमिट मात्र लागते.
आर्थिकदृष्ट्या हा देश गरीब असला तरी जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून गणला जातो. 75 टक्के बौद्धधर्मीय लोक असून, बाकी हिंदू धर्माचे लोक तिथे राहतात. ’झोंगखा’ ही येथील प्रमुख भाषा आहे. भारतीय चलन येथे चालते त्यामुळे आपल्याला तिथे खरेदी करणे सोपे जाते. शेती, पर्यटन आणि जलविद्युत निर्मिती, तसेच सिमेंट, लाकूड, तांदूळ, मका यांचा व्यापार करणे हे यांचे प्रमुख व्यवसाय आहेत. भारत हा त्यांचा मुख्य ट्रेडिंग पार्टनर असून, भारताबरोबर त्यांचे इम्पोर्ट-एक्स्पोर्ट चालू असते. येथील साक्षरता रेट 71% आहे. मठामधून येथे शिक्षण देण्यात येते, तसेच आता मॉडर्न एज्युकेशनमध्येही भूतान पुढे आहे. येथे शिक्षण आणि मेडिकल पूर्णपणे फ्री आहे. त्याबाबतीत घडलेला किस्सा मोठा ऐकण्यासारखा आहे.
एक दिवस माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांना पहाटे श्वसनाचा त्रास होऊ लागला म्हणून मग आमच्या गाइडला बोलावून घेतले. त्याने लगेच त्यांना टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्यांचे आधारकार्ड बघितले व एक फॉर्म भरण्यास सांगितले. ताबडतोब त्यांना ट्रीटमेंट देण्यात आली तसेच औषध-गोळ्या देण्यात आले. किती बिल झाले हे विचारले असता एकही पैसा त्यांच्याकडून घेण्यात आला नाही हे आम्ही सर्वांनी ट्रीपमध्ये अनुभवले. हेच जर अमेरिकेत घडले असते तर काय झाले असते, याचाच विचार आमच्या सर्वांच्या मनात रुंजी घालत होता. खरोखरच भूतानच्या मदतीच्या हातामुळे हे सहज शक्य झाले होते आणि फार मोठ्या दिव्यातून माझ्या मैत्रिणीचे मिस्टर बाहेर पडले होते.
ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते मे हे भूतानमध्ये पर्यटनासाठी जाण्याचे योग्य महिने आहेत. सुंदर व भव्य बौद्ध मठ,
बुद्धविहार, स्तूप, सुंदर भव्य बगीचे पाहण्यासारखे असून, समुद्रसपाटीपासून 3210 मीटर उंचीवर, ’टायगर नेस्ट’ नावाचा बौद्ध मठ अतिशय निसर्ग परिसरात पाहताना आपण खरोखरच भान हरखून जातो. पुनाखामधील एक जुना किल्ला, द्रतुला पास, व्हिक्ट्री प्लेस, आयर्न ब्रिज, सहा मजली नॅशनल म्युझियम, चेलाला पास जोमल्हरी हाईट-हिमाच्छादित कडा तसेच पोंचु वांगचू नद्यांचा संगम इत्यादी येथील अनेक प्रेक्षणीय, निसर्गरम्य स्थळे दोन डोळ्यांनी तृप्त होऊन पाहत कॅमेेर्‍यामध्ये आपण त्यांना बंदिस्त करतो.
येथील अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे ट्रेकिंग, बाइकिंग, रिव्हर राफ्टिंगबरोबरच तिरंदाजी हा येथील लोकप्रिय खेळ आहे. येथे कुठेही आपल्याला ट्रॅफिक लाइट्स दिसत नाहीत. ट्रॅफिक पोलीसच सर्व यातायात सांभाळतात. येथे पुरुषांच्या राष्ट्रीय पोशाखाला ’खो’तर महिलांच्या पोशाखाला ’किरा’ असे म्हणतात. येथे मेघालयाप्रमाणे लग्नानंतर पुरुष महिलेच्या घरी जातो. बहुतांश व्यवसायामध्ये महिला काम करताना आढळतात. येथील लोक जन्मदिन लक्षात ठेवत नाहीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वजण आपला जन्मदिवस साजरा करतात. नाचगाणं, मौजमस्ती करून आपल्या सांस्कृतिक परंपरा सांभाळून आनंदी राहणं हे या लोकांचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.
भूतानहून परतताना आम्ही पोंचू नदीवर थोडी मौजमस्ती करून, फोटो काढून बागडोगरा या विमानतळावर पोहोचलो आणि त्यानंतर आम्हाला समजले की, ज्या नदीवरून आम्ही नुकतेच परतलो होतो तेथे भूस्खलन होऊन नदीला पूर आला होता. परमेश्वराची कृपा म्हणून आम्ही तिथून नुकतेच बाहेर पडून विमानाने सुखरूप घरी पोहोचलो आणि आमची भूतानची ट्रीप खरोखरच आनंदी तसेच अविस्मरणीय झाली.

Bhutan is a picturesque country.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोगनवेल

पावसाळा सुरू झाला म्हणून जरा बागेत नवीन झाडं लावण्यासाठी नर्सरीत रोपं आणण्यासाठी गेले... नर्सरीत छान…

2 hours ago

केळीचे झाड आणि सत्यनारायण पूजा

- विष्णू वाघ भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांना केवळ वनस्पती म्हणून पाहिले जात नाही, तर त्यांच्यामध्ये देवत्व,…

2 hours ago

शिक्षणातून रोजगाराकडे…‘मविप्र’ची नवी ओळख!

मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा आज दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी वाढदिवस. त्यानिमित्त...…

2 hours ago

उपक्रमशीलता महत्त्वाची

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण असतो. शाळा, महाविद्यालय, शिकवणी, गृहपाठ आणि परीक्षांची तयारी…

2 hours ago

कॉलेज बंक चहा, मिसळ अन् मनमोकळे संवाद!

कॉलेज म्हटले की, वर्गातील लेक्चर्स, परीक्षा, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आणि त्यासोबतच कधी तरी केलेला कॉलेज बंक!…

3 hours ago

माळेगाव एमआयडीसीत 60 लाखांच्या पावडरवर डल्ला; 13 जन रडारवर

सिन्नर : प्रतिनिधी येथील माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून तब्बल तीन टन व्हे प्रोटीन पावडर गायब…

3 hours ago