शिवडी सोनेवाडी भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरुच
निफाड : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील शिवडी सोनेवाडी उगांव परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे मात्र वनविभागाकडुन कोणतीहि ठोस उपाययोजना केली जात नसल्याने संतापात भर पडत आहे
शिवडी परिसरातील सोनेवाडी रोडलगत असलेल्या कातकाडे वस्तीवर रविवारी दि ७ रोजी मध्यरात्री बिबट्याने घरापुढे ओट्यावर बसलेल्या कुत्र्याला डरकाळी फोडत ओढुन नेत ठार केले नागरिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच बिबट्याचा नागरिकांवरही डरकाळी फोडुन धावण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाली आहे सदरचा परिसर हा अत्यंत रहदारीचा असुन या भागातुन अनेक जेष्ठ नागरिक ,शाळकरी मुले मुली एकटेच जात येत असतात त्यांचेवर हल्ला झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा त्वरीत लावण्यात यावा अशी मागणी अरुण कातकाडे ,संजय शिंदे , संतोष कातकाडे ,मनोज खापरे, राजेंद्र क्षीरसागर, लाला कातकाडे, बाळासाहेब क्षीरसागर, कैलास सांगळे, संजय खापरे,आप्पासाहेब कातकाडे आदींसह नागरिकांनी केली आहे
शिवडी शिवारातील शिंदे वस्तीवर मध्यरात्री बिबट्याने उच्छाद मांडला होता मात्र अद्यापही कार्यवाही केली गेली नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असुन जिवितहानी अथवा पशुधनाची हानी झाल्यास वनविभागाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी दिला आहे
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…