चिंचखेड येथे बिबट्याचे आढळले तब्बल इतके बछडे

चिंचखेड येथे बिबट्याचे तीन बछडे आढळले

दिंडोरी : प्रतिनिधी

चिंचखेड दिंडोरी येथील बहादूर शिवारात माजी सरपंच निवृत्ती मातेरे यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहे.ऊसतोड चालू असताना त्या उसाच्या क्षेत्रामध्ये साधारणपणे 25 ते 30 दिवसांचे बिबट्याचे तीन बछडे ग्रामस्थांना आढळून आले चिंचखेड येथील वन्यजीव व सरप रक्षक किरण कांबळे जीवन सतळे यांनी उसाच्या क्षेत्राजवळ जाऊन ग्रामस्थांना त्या बिबट्याच्या बछड्यांपासून दूर केले व त्या बछड्यांचे संरक्षण करून वनविभागाला पाचारण केले नाशिक वनविभागाचे उपवन संरक्षक उमेश वावरे व सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे तसेच दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी या सर्व घटनास्थळी हजर होऊन त्यानी परिसराची व बिबट्याच्या बछड्याची पाहणी केली साधारणपणे एक महिन्याचे बछडे असतील असे उमेश वावरे यांनी ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांना या परिसरापासून दूर ठेवले आणि या तीन बिबट्याच्या पिल्लांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून मादी बिबट्या रात्री साडेदहाच्या दरम्यान कॅमेरात कैद झाली या पिल्लांना तिने दूध पाजले आणि आपल्या तोंडात एका पिल्लाला घेऊन मादी बिबट त्या ठिकाणाहून आपल्या बछड्यांना घेऊन पसार झाली ,बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा वावर या परिसरामध्ये असून शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये पाणी द्यावयाचे असल्याने रात्रीच्या वेळेस गहू हरभरा पिकांना या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पाणी भरता येत नाही भीतीचे वातावरण परिसरात आहे चिंचखेडचे पोलीस पाटील सोनवणे यांच्या मेंढ्यांच्या कळपामधून भर दुपारी बारा वाजता बोर नाल्यातून मेंढरू ओढून नेऊन मेंढराचा फरशा पाडला शेत शिवारात तर पाळीव कुत्र्यांना बिबट्या उचलून नेऊन शिकार करतो विजेच्या लपंडावामुळे वेळापत्रकानुसार रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्याचे कामे करावी लागतात. त्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहे.शेतमजूर दिवसा सुद्धा काम करताना घाबरत असल्याने वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी कादवा कारखान्याची संचालक रावसाहेब पाटील त्र्यंबकराव पाटील सुभाष मातेरे यांनी केली आहे,

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

7 hours ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

3 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

3 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

3 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

3 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

3 days ago