बिअरच्या फुटलेल्या बाटलीने तिघांवर वार
सिन्नर : प्रतिनिधी
वाइन शॉपीबाहेर सुरू असलेला तरुणांचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दुकानदारासह त्याच्या नातेवाइकांना आणि मित्रांना मारहाणीला सामोरे जावे लागले. वादात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून तरुणांनी बिअरची बाटली फोडून तिघांवर सपासप वार केले.
या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, मुसळगाव एमआयडीसीतील स्टाइस कॉम्प्लेक्स येथे मंगळवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे बिअर व वाइन शॉपीमधून पंडित त्र्यंबक साबळे (वय 26), मंगू सजन आव्हाड, शंकर घुले आणि शरद आव्हाड यांनी बिअरच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. त्यानंतर चौघेही आपापसांत वाद घालत एकमेकांवर बाटल्या उगारत होते. हा प्रकार पाहून दुकानदार ऋषीकेश ज्ञानेश्वर पोटे (वय 24, रा. कुंदेवाडी) यांनी त्यांना येथे वाद करू नका, निघून जा, असे समजावले. मात्र, याचा राग आल्याने पंडित साबळे याने पोटे यांची गच्ची पकडून शिवीगाळ व मारहाण केली. मंगू आणि शरद आव्हाड यांनीही त्यांना हाताने मारहाण केली. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी ऋषीकेश यांचे चुलते महेश अरुण पोटे आणि त्यांचे मित्र मध्ये पडले. त्यावेळी पंडित साबळे याने बिअरची बाटली अर्धवट फोडून महेश पोटे यांच्या डोक्यात, पोटात आणि खांद्यावर वार केले. तसेच विठ्ठल कारभारी कांदळकर यांच्या डोक्यावर, खांद्यावर व पोटावर, तर रमेश राजाराम आव्हाड यांच्या उजव्या हातावर बाटलीने वार करून त्यांना जखमी केले.
याप्रकरणी ऋषीकेश पोटे यांच्या फिर्यादीवरून पंडित साबळे, मंगू आव्हाड (दोघे रा. दोडी खुर्द), शंकर घुले आणि शरद आव्हाड (दोघे रा. दापूर) यांच्याविरोधात एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 118(1), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Bloody brawl outside a wine shop
डोंगळे, अनधिकृत मोटारी व अनधिकृत वीज जोडण्यांवर होणार कारवाई ; निफाड तालुक्यात 11 मंडळांत भरारी…
निर्माल्याचा खच, नदीपात्रात वाहनांची धुलाई नाशिक : प्रतिनिधी गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला…
अनेक आस्थापनांमध्ये समित्या कागदावरच कार्यरत 10 हजारांहून अधिक आस्थापनांपैेकी 482 चीच तपासणी नाशिक : देवयानी…
जागतिक पुरुष दिन विशेष नाशिक : प्रतिनिधी कुटुंबाचा आधारस्तंभ, जबाबदारीचे ओझे वाहणारा आणि प्रत्येक संकटात…
शिक्षणमंत्री भुसेंना अहवाल सादर केला जाणार नाशिक : प्रतिनिधी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या घटलेल्या पटसंख्येवरून शालेय…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरातील प्रसिद्ध अशा सायंतारा वडा कचोरी सेंटरवर ‘एफडीए’ने अस्वच्छतेचा ठपका ठेवत…