निर्माल्याचा खच, नदीपात्रात वाहनांची धुलाई
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी निर्माल्य टाकले जात असून, प्लास्टिक कचरा आणि पूजेचे साहित्य पाण्यावर तरंगताना दिसत आहे. नियमित स्वच्छतेअभावी निर्माल्य पाण्यातच सडत असून, नदीपात्रातून दुर्गंधी पसरत आहे. एकीकडे नदी स्वच्छतेचे दावे केले जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र अस्वच्छतेचे चित्र कायम आहे.
गोदावरीत येणारे भाविक आणि नागरिकांकडून निर्माल्य तसेच पूजेचे साहित्य थेट नदीपात्रात टाकले जात आहे. नदीच्या काठावरही कचर्याचे ढीग साचले आहेत. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी गटारींचे काळे आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण वाढत असून, परिसरातील नागरिक आणि भाविकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवाळीनंतर नदीपात्रात कपडे धुण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांकडून नदीत कपडे धुतले जात असतानाच काही वाहनचालक दुचाकी, रिक्षा आणि अन्य वाहने थेट नदीपात्रात उतरवून धूत आहेत. वाहनांच्या धुलाईमुळे तेल, ग्रीस आणि साबणमिश्रित पाणी नदीत मिसळत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होत असताना हे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.
कारवाईचा धाक नाही
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, प्रत्यक्षात नदीकाठावर सुरक्षारक्षकांची गस्त दिसत नसल्याने निर्माल्य टाकणे, कपडे धुणे आणि नदीपात्रात वाहने उतरवून धुलाई करण्याचे प्रकार सुरू आहेत. नियमभंग करणार्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गोदावरीच्या प्रदूषणात भर
नदीपात्रात निर्माल्य आणि प्लास्टिक कचर्याचा खच साचत असून, पूजेचे साहित्य पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी गटारींचे काळे पाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यातच वाहनांच्या धुलाईतून तेल, ग्रीस आणि साबणमिश्रित पाणी नदीत जात असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. नियमित स्वच्छता आणि कठोर कारवाईअभावी गोदावरीच्या अस्वच्छतेचा प्रश्न कायम आहे.
The Godavari River in the grip of pollution
बिअरच्या फुटलेल्या बाटलीने तिघांवर वार सिन्नर : प्रतिनिधी वाइन शॉपीबाहेर सुरू असलेला तरुणांचा वाद मिटवण्यासाठी…
डोंगळे, अनधिकृत मोटारी व अनधिकृत वीज जोडण्यांवर होणार कारवाई ; निफाड तालुक्यात 11 मंडळांत भरारी…
अनेक आस्थापनांमध्ये समित्या कागदावरच कार्यरत 10 हजारांहून अधिक आस्थापनांपैेकी 482 चीच तपासणी नाशिक : देवयानी…
जागतिक पुरुष दिन विशेष नाशिक : प्रतिनिधी कुटुंबाचा आधारस्तंभ, जबाबदारीचे ओझे वाहणारा आणि प्रत्येक संकटात…
शिक्षणमंत्री भुसेंना अहवाल सादर केला जाणार नाशिक : प्रतिनिधी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या घटलेल्या पटसंख्येवरून शालेय…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरातील प्रसिद्ध अशा सायंतारा वडा कचोरी सेंटरवर ‘एफडीए’ने अस्वच्छतेचा ठपका ठेवत…