महाराष्ट्र

मनपा शाळांच्या विकासासाठी 106 कोटींचा आराखडा

शिक्षणमंत्री भुसेंना अहवाल सादर केला जाणार

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या घटलेल्या पटसंख्येवरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाराजी व चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, त्यांनी पटसंख्येत सुधारणा करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाला मनपा शिक्षण विभागाचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मनपा प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी 106 कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा तयार केला असून, लवकरच तो ना. भुसे यांना सादर केला जाणार आहे.
दरम्यान, शहरातील 88 शाळांचे सर्वेक्षण करून तब्बल 106 कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा तयार केला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी शिक्षण विभागाने मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून शाळांचे तांत्रिक सर्वेक्षण करण्याची सूचना वजा विनंती केली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी नाशिक महापालिका शिक्षण विभागाची विशेष आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत ना. भुसे यांनी मनपा शाळांची पटसंख्या 40 हजारांवरून 29 हजारांपर्यंत खाली आल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. पटसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा सादर करण्याचे
निर्देश त्यांनी दिले होते. महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा कायापालट करण्यासाठी मनपा शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने मनपा शिक्षण विभागाने पावले उचलत महापालिका हद्दीतील 88 प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या गरजांचा आढावा घेतला. या सर्वेक्षणातून शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या, मूलभूत सोयीसुविधा आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी 106 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. शाळांच्या इमारतींचे बांधकाम, देखभाल दुरुस्ती, संरचनात्मक तपासणी आणि आवश्यक निधीचे अचूक तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून अंतिम विकास आराखडा निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित शाळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून तांत्रिक आराखडा तयार करावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शाळांसाठी हवी ती मदत
प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे असणे अनिवार्य असून, त्यासाठी जिल्हा, राज्यस्तर किंवा लोकसहभागातून (सीएसआर) निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरजेनुसार नवीन शाळा किंवा वाढीव वर्गांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केल्यास त्यांना अवघ्या एका तासाच्या आत मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन ना. दादा भुसे यांनी दिले आहे. चांगल्या शाळा आणि पटसंख्यावाढीसाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन ना. भुसे यांनी दिले आहे. तसेच शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामांसाठी देण्याची प्रवृत्ती थांबवून सर्व नगरसेवकांच्या बैठकीतून शाळांचा विकास साधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

A ₹106 crore plan for the development of municipal corporation schools

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पुरुषांच्या वेदनांनाही न्याय मिळणार कधी?

जागतिक पुरुष दिन विशेष नाशिक : प्रतिनिधी कुटुंबाचा आधारस्तंभ, जबाबदारीचे ओझे वाहणारा आणि प्रत्येक संकटात…

2 minutes ago

‘सायंतारा’वर एफडीएची कारवाई

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरातील प्रसिद्ध अशा सायंतारा वडा कचोरी सेंटरवर ‘एफडीए’ने अस्वच्छतेचा ठपका ठेवत…

30 minutes ago

शिर्डीला निघालेल्या साईभक्तांवर काळाचा घाला टळला

इगतपुरीत स्लॅब कोसळून चार महिलांसह 17 जण जखमी, रात्री साडेदहाची दुर्घटना इगतपुरी : प्रतिनिधी मुंबई-नाशिक…

1 hour ago

कसबे वणी-नाशिक रस्त्यावर अपघातात एक ठार, सहा जखमी

ओझरखेड धरणाजवळ थार-अर्टिगाची धडक दिंडोरी : प्रतिनिधी कसबे वणी- नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्यापुढील हॉटेल…

1 hour ago

चांदीची चमक उतरली! भाव वर्षातील नीचांकी पातळीवर

जानेवारीच्या विक्रमी उच्चांकावरून 61 टक्क्यांची घसरण; 1980 व 2011 मधील उच्चांकही मागे मुंबई : प्रतिनिधी…

2 hours ago

राज्यात थंडीचा कडाका, ढगाळ हवामान

‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली मुंबई : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरातील मध्य-दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर निर्माण…

2 hours ago