नाशिक

‘सायंतारा’वर एफडीएची कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील प्रसिद्ध अशा सायंतारा वडा कचोरी सेंटरवर ‘एफडीए’ने अस्वच्छतेचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘एफडीए’कडून हॉटेल्स व भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणार्‍या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 17) अन्न व औषध प्रशासनाकडून सायंतारा वडा कचोरी सेंटरची तपासणी करण्यात आली. यानंतर अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात
आली आहे.
अस्वच्छ परिस्थितीत खाद्यपदार्थ तयार करणे आणि कच्च्या मालाची अस्वच्छ पद्धतीने साठवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली मार्केटमधील मे. सायंतारा साबूदाणा वडा व बटाटा कचोरी या खाद्य आस्थापनेचे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे नोंदणी प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ निलंबित केले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली.
यावेळी खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया अस्वच्छ व अस्वास्थ्यकारक परिस्थितीत सुरू असल्याचे, तसेच खाद्यपदार्थ आणि कच्च्या मालाची साठवणूकही अस्वच्छ पद्धतीने केली जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अन्नपदार्थ दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी ही कारवाई केली.
अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता राखणे आणि कच्च्या मालाची योग्य साठवणूक करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

FDA action against ‘Sayantara’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पुरुषांच्या वेदनांनाही न्याय मिळणार कधी?

जागतिक पुरुष दिन विशेष नाशिक : प्रतिनिधी कुटुंबाचा आधारस्तंभ, जबाबदारीचे ओझे वाहणारा आणि प्रत्येक संकटात…

14 minutes ago

मनपा शाळांच्या विकासासाठी 106 कोटींचा आराखडा

शिक्षणमंत्री भुसेंना अहवाल सादर केला जाणार नाशिक : प्रतिनिधी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या घटलेल्या पटसंख्येवरून शालेय…

31 minutes ago

शिर्डीला निघालेल्या साईभक्तांवर काळाचा घाला टळला

इगतपुरीत स्लॅब कोसळून चार महिलांसह 17 जण जखमी, रात्री साडेदहाची दुर्घटना इगतपुरी : प्रतिनिधी मुंबई-नाशिक…

1 hour ago

कसबे वणी-नाशिक रस्त्यावर अपघातात एक ठार, सहा जखमी

ओझरखेड धरणाजवळ थार-अर्टिगाची धडक दिंडोरी : प्रतिनिधी कसबे वणी- नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्यापुढील हॉटेल…

2 hours ago

चांदीची चमक उतरली! भाव वर्षातील नीचांकी पातळीवर

जानेवारीच्या विक्रमी उच्चांकावरून 61 टक्क्यांची घसरण; 1980 व 2011 मधील उच्चांकही मागे मुंबई : प्रतिनिधी…

2 hours ago

राज्यात थंडीचा कडाका, ढगाळ हवामान

‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली मुंबई : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरातील मध्य-दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर निर्माण…

2 hours ago