नाशिक

थेटाळेत विहिरीत आढळला पती-पत्नीचा मृतदेह

लासलगाव : वार्ताहर
थेटाळे (ता. निफाड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत तरुण पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माजी पोलीसपाटील बाळकृष्ण पर्वत पवार यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात खबर दिली की, दि. 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मृतांचे शेत गट क्रमांक 114 मधील विहिरीत योगेश भाऊसाहेब शिंदे (वय 35) व पत्नी सोनाली योगेश शिंदे (वय 32) हे दोघेही बुडालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल राठोड यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अ. मृत्यू रजि. नं. 63/2025 भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा कलम 194 नुसार नोंद करण्यात आली आहे.

Bodies of husband and wife found in well in Thetale

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

27 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

35 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

40 minutes ago